Home > मॅक्स किसान > पीक काढायचीत पण पाऊस येणार का?

पीक काढायचीत पण पाऊस येणार का?

सध्या खरिपाची पिक काढणी चालू आहे. शेतकऱ्यांच्या मनात आहे की पाऊस येणार आहे की काय? सोयाबीन, मका कापणी, कपाशी वेचणी चालु आहे. काहींचे गोळा करण्याच्या स्टेजमध्ये आहे. काहींना रोपासाठी कांद्याचे बियाणे टाकावयाचे आहे.  महाराष्ट्रात विभागनियाय काय परीस्थिती राहील यावर हवामानतज्ञ माणिकराव खुळे काय सांगताहेत ते पाहू...

पीक काढायचीत पण पाऊस येणार का?
X

१- मराठवाडा -

विशेषतः आज व उद्या मराठवाड्यातील औरंगाबाद बीड जालना परभणी लातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली तसेच अकोला बुलढाणा वाशीम यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर त्याचबरोबर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर ह्या जिल्ह्यात वीजा व गडगडाटीसह जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यानंतर पुढील पाच दिवसासाठी मात्र मध्यम पावसाच्या शक्यतेचे वातावरण असेल असे वाटते.

२-उत्तर महाराष्ट्र-

संपूर्ण खान्देश व नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात तसेच नगर जिल्ह्यात आजपासुन पुढील चार दिवस दुपारनंतर वीजा व गडगडाटीसह मध्यम अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. त्यानंतर प्रमाण काहीसे कमी होईल.

३-उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात तूरळक ठिकाणी किरकोळ ते साधारण पावसाची शक्यता जाणवते.

महाराष्ट्रासाठी फार मोठी वातावरणीय प्रणाली आहे, असे नाही.आणि खुप मोठा पाऊस आहे अशा पद्धतीचे मात्र वातावरण नाही. कारण ग्रामीण भाषेतील शेतकऱ्यांत मराठी शब्द आहे की, पावसापेक्षा गडगडाटीचे काहूर जास्त आहे त्या पद्धतीचे वातावरण समजावे.

पावसाच्या शक्यतेच्या भाषेत म्हटले तर ही शक्यता साधारण ३०ते ३५ टक्के जाणवते. एकदम उघडीपीची वाट बघायची असेल तर आठवड्याच्या पुढे कमी अधिक काळ वाट बघावी लागेल. म्हणून खरिप पीक काढण्याचे चालू असलेले काम आहे ते अशाच पद्धतीने चालू ठेवावं. त्याला पर्याय नाही, असं माझं मत आहे.

माणिकराव खुळे,

Meteorologist (Retd.), IMD Pune.

ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.

Updated : 7 Oct 2022 7:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top