Home > मॅक्स किसान > विदर्भासह नांदेड जिल्ह्यांत गारपिटीचा तडाखा: पिकांचे नुकसान

विदर्भासह नांदेड जिल्ह्यांत गारपिटीचा तडाखा: पिकांचे नुकसान

IMD हवामान खात्याने दिलेल्या ईशाऱ्या नुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अवकाळी गारपीट ने तडाखा दिला. सुपारीच्या आकाराच्या गारांमुळे गहू, हरभरा, तूर, कापूस पिके आडवी पडली, यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा संकट उभं राहिलं आहे

विदर्भासह नांदेड जिल्ह्यांत गारपिटीचा तडाखा: पिकांचे नुकसान
X

IMD हवामान खात्याने दिलेल्या ईशाऱ्या नुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अवकाळी गारपीट ने तडाखा दिला. सुपारीच्या आकाराच्या गारांमुळे गहू, हरभरा, तूर, कापूस पिके आडवी पडली, यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा संकट उभं राहिलं आहे

विदर्भात सर्वाधिक नुकसान

विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा बसला. याभागातील शेकडो हेक्टर वरील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.गहू हरभरा,तूर,शेतात आडवी पडली आहे.अनेक शेतकऱ्यांच पीक कापणीवर आली होती, तर काही शेतकऱ्यांनी पीक कापून शेतात ठेवली होती. हातातोंडांशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमूळ हिरावून घेतला. यंदा कमी पाऊस झाला आहे अगोदरच शेतकरी संकटात असतांना रब्बी हंगामावरही निसर्गाने पाणी फिरवलं आहे. सरकारने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मराठावढ्यात गारपीट एकाचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात मुदखेड, उमरी, हिमायतनगर, भोकर व किनवट या तालुक्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडासह गारपीट झाली. मुदखेड तालुक्यात पिंपळकौठा चोर येथे वीज पडून दत्ता दिगांबर वाघमारे (२२) याचा मृत्यू झाला. आपल्या शेताकडून घरी येत असतांना वाटेत अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

विदर्भ-मराठवाड्यात तीन दिवस गारपिट

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राकडून येणारे आर्द्र वारे आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या संयोगामुळे झालेला वातावरणातील बदल आणखी ७२ तास कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ तयार झाले असून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Updated : 12 Feb 2024 5:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top