Home > मॅक्स किसान > गोकुळच्या वादळी सभेची परंपरा कायम, सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

गोकुळच्या वादळी सभेची परंपरा कायम, सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. मागील वर्षीची सभा झाली नसल्याचा आक्षेप घेत विरोधकांनी त्या सभेचे इतिवृत्त वाचण्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधक सदस्य आमनेसामने आल्याने मोठा गदारोळ उडाला.

गोकुळच्या वादळी सभेची परंपरा कायम, सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
X

हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील संघाच्या पशुखाद्य कारखान्याच्या आवारात जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. दरवर्षी सभेमध्ये मोठा गोंधळ बघायला मिळत असतो. सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा वादळी होणार हे स्पष्ट होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच सभासद सभास्थळी दाखल होत होते. दुपारी एक वाजता संचालक मंडळ व्यासपीठावर आल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

गेल्या वेळीची सभा झाली नसल्याचा आक्षेप घेत विरोधकांनी त्या सभेचे इतिवृत्त वाचण्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधक सदस्य आमनेसामने आल्याने मोठा गदारोळ उडाला. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे प्रकृतीच्या कारणास्तव सभेला गैरहजर असल्यामुळे ज्येष्ठ संचालक अरूण नरके सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संघाचे कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर यांनी प्रास्ताविक केले. घाणेकर यांनी सभेचा वृतांत वाचून दाखविला. यावेळी सर्व विषय वाचून दाखवा, अशी मागणी सभासदांतून करण्यात आली. वाचन सुरू झाल्यानंतर माईक देण्याची जोरदार मागणी सभासदांनी केली.

संचालक रणजीत पाटील यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपली असं जाहीर केलं. ही सभा गुंडालळी असा आरोप विरोधकांनी केला. तर सभा व्यवस्थित झाली असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. मात्र, विरोधकांच्या गोंधळामुळे हे करता आले नसल्याचे सभेचे अध्यक्ष अरुण नरके यांनी सांगितलं. निवडणुकीमुळे सभा वादळी होणार हे निश्चित होतं आणि घडले ही तसंच. मात्र, यंदा खुर्चा बांधून ठेवल्याने हाणामारी न होता फक्त गोंधळामध्येच ही सभा गुंडाळण्यात आली

Updated : 3 Feb 2021 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top