Home > मॅक्स किसान > कृषी विज्ञान केंद्रात रानभाजी महोत्सव

कृषी विज्ञान केंद्रात रानभाजी महोत्सव

कृषी विज्ञान केंद्रात रानभाजी महोत्सव
X

कृषी विभागाचा आत्मा प्रकल्प आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे रानभाजी महोत्सव व प्रदर्शन विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवांमध्ये वैयक्तिक महिला बचत गट,शेतकरी गट सहभागी झाले होते.उत्कृष्ट रान भाज्याचे नमुने आणणाऱ्या शेतकरी व महिला बचत गट यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. पावसाळ्यात शेतात राना वनात मोठ्या प्रमाणात रानभाज्या येतात यामध्ये कंटोली ,घोळ, अंबुशी, खुरडा ,केना, सुरण, दिंडक, कुडा, पाथरी ,भुई, आवळी ,कपाळफोडी, तरोटा, आघाडा, उंबर, चिमूर, सराटे, मायाळू आधी विविध प्रकारच्या रानभाज्या या महोत्सवामध्ये ठेवण्यात आल्या होत्या.पूर्वजांना या रानभाज्या माहिती होत्या त्याची भाजी कशी तयार करायची याची पद्धत त्यांना माहिती होती.आताच्या पिढीला या भाज्यांची ओळख नाही आपल्या पूर्वजांचा हा ठेवा लुप्त होत आहे.त्याचे संवर्धन करण्यासाठी व नैसर्गिक रान भाज्यांची माहिती व्हावी यासाठी कृषी विभाग आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते असे कृषी विज्ञान केंद्र आत्माचे प्रकल्प संचालक बी एस तौर, बचत गट महिला आणि शेतकऱ्यांनी सांगितले.

Updated : 16 Aug 2023 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top