Home > मॅक्स किसान > Farmers tractor rally: दिल्लीत निघणार ऐतिहासिक ट्रॅक्टर मोर्चा

Farmers tractor rally: दिल्लीत निघणार ऐतिहासिक ट्रॅक्टर मोर्चा

कशी असेल ट्रॅक्टर रॅली? किती ट्रॅक्टर होणार सहभागी? वाचा...

Farmers tractor rally: दिल्लीत निघणार ऐतिहासिक ट्रॅक्टर मोर्चा
X

गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज शेतकरी संघटनांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त (26 जानेवारी) ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं आहे. या ट्रॅक्टर रॅलीत साधारण एक लाखांपर्यंत ट्रॅक्टर सहभागी होतील.

दिल्ली पोलीस आणि शेतकरी संघटनांमधील ठरलेल्या नियोजनानुसार आज राजपथावरील संचलन संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची परेड सुरू होईल.

या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देऊ नये अशी मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्याय़ालयात केली होती. पण न्यायालयाने हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

आज दिल्लीमध्ये निघणारी रॅली ही सुमारे १०० किलोमीटरची असेल असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने कायद्यांना स्थगितीचा प्रस्ताव मान्य असेल तर चर्चा करु अशी भूमिका घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली आहे.

Updated : 26 Jan 2021 4:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top