Home > मॅक्स किसान > #FARMERPROTEST – दिल्लीत १०० किमी रॅलीचा शेतकऱ्यांचा निर्धार, पोलिसांची परवानगी मिळाल्याचा दावा

#FARMERPROTEST – दिल्लीत १०० किमी रॅलीचा शेतकऱ्यांचा निर्धार, पोलिसांची परवानगी मिळाल्याचा दावा

#FARMERPROTEST – दिल्लीत १०० किमी रॅलीचा शेतकऱ्यांचा निर्धार, पोलिसांची परवानगी मिळाल्याचा दावा
X

प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी पोलिसांनी अखेर शेतकऱ्यांना परवानगी दिल्याची माहिती आंदोलक शेतकरी संघटनांतर्फे देण्यात आली आहे. पण त्यासाठी रॅलीचा मार्ग शेतकऱ्यांना उद्या पोलिसांना कळवावा लागणार आहे. स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत रॅलीबाबत एकमत झाले आहे, फक्त आता रॅलीचा मार्ग लवकरच ठरवला जाईल आणि तो मार्ग रविवारी जाहीर केला जाईल असे त्यांनी सांगितले.

२६ जानेवारीला दिल्लीच्या सीमेवर लावलेले बॅरिकेड्स काढले जाणार आहेत. नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमधून शेतकरी सहभागी झाले आहेत. या रॅलीला परवानगी देऊ नये अशी मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्याय़ालयात केली होती. पण न्यायालयाने हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

दरम्यान दिल्लीमधील रॅली ही सुमारे १०० किलोमीटरची असेल असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने कायद्यांना स्थगितीचा प्रस्ताव मान्य असेल तर चर्चा करु अशी भूमिका घेतल्यनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर या रॅलीला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली आहे.

Updated : 23 Jan 2021 3:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top