Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांनो कापूस, सोयाबीन विकू नका, सरकार हमी भावाने खरेदी करणार

शेतकऱ्यांनो कापूस, सोयाबीन विकू नका, सरकार हमी भावाने खरेदी करणार

Farmers, do not sell cotton and soybeans, the government will buy them at MSP

शेतकऱ्यांनो कापूस, सोयाबीन विकू नका, सरकार हमी भावाने खरेदी करणार
X

दिवाळी उलटली तरीही सरकारने कापूस सोयाबीन खरेदी केंद्र सुरु केल नाही, यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कापूस सोयाबीन पडेल भावात व्यापाऱ्यांना द्यावा लागला. आता दिवाळी संपली सरकारला उशीरा जाग आली आहॆ. आता सरकार शेतकऱ्यांचा सर्व कापूसआणि सोयाबीन हमी भावाने विकत घेणार आहॆ. कमी भावात व्यापाऱ्यांना माल विकू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलं आहॆ.

शेतकऱ्यांना 30 आक्टोबरला नोंदणीला सुरवात :

हमीभावान खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरु होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकऱ्यांची नोंदणी झाल्यानंतर हमीभावाने खरेदी सुरु होईल. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने कमी भावात व्यापाऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. सर्व शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच जे शेतकरी हमीभावाने सोयाबीन विकू इच्छितात त्या सर्वांचे सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. राज्य सरकार, पणन विभाग, नाफेड आणि केंद्र सरकारने राज्यात खरेदीचे जाळे निर्माण केले आहे.

सरकार शेतकऱ्याच्या सर्व सोयाबीनची खरेदी करेल. व्यापारी हमीभावाने खरेदी करणार असेल तरच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल द्यावा. अन्यथा सरकारी खरेदी केंद्रांवर हमीभावाने सोयाबीनची विक्री करावी,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सोयाबीन पडेल भावात खरेदी:

राज्यात सध्या सोयाबीनचा बाजारभाव कमी आहे. सरकारने यंदा सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजारात सध्या सोयाबीन ३५०० ते ४ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. हमीभावापेक्षा किमान १५०० रुपयाने कमी दरात सोयाबीन विकले जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सोयाबीनची खरेदी तातडीने सुरु करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. यासाठी अनेक भागात शेतकऱ्यांनी आंदोलनही केली.

Updated : 24 Oct 2025 10:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top