Home > मॅक्स किसान > शेतकरी आंदोलन तीव्र: सरकार सोबत आज महत्त्वपूर्ण बैठक

शेतकरी आंदोलन तीव्र: सरकार सोबत आज महत्त्वपूर्ण बैठक

शेतकरी आंदोलन तीव्र:  सरकार सोबत आज महत्त्वपूर्ण बैठक
X

MSP हमी भावाचा कायद्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीसाठी शेतकऱ्यांच आंदोलन तीव्र होतांना दिसत आहे. काल हरियाणामध्ये आंदोलन तीव्र झाले आहे. हरियाणात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. कुरुक्षेत्रात बीकेयूचे नेते गुरनामसिंग चढुनी यांच्या नेतत्वाखाली टॅक्टर मोर्चा काढला होता.

दुसरीकडे हरियाणा आणि पंजाब सीमेवर सुरू शेतकरी आंदोलनाचा पाचवा दिवस मोठया घटना न घडता शांततेत पार पडला. शंभू सीमेवर तरुण शेतकरी अधिक आक्रमक आहेत. बॉर्डर वरील बॅरिकेट तोडण्यासाठी पुढे जाऊ नयेत म्हणून वृद्ध शेतकऱ्यांनी संयमाची भूमिका घेत दोरी धरून अडथळ्यांपासून काही अंतरावर उभे होते. काल चंदीगड येथे सरकारसोबत होणाऱ्या चर्चेच्या चौथ्या फेरीसाठी बंद दाराआड डावपेच आखले जात होते. ही चर्चा निर्णायक होईल, असे मानले जात आहे मात्र चर्चा अपूर्ण राहिली.आज पुन्हा महत्वपूर्ण चर्चा शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार मध्ये होणार आहे.

Updated : 18 Feb 2024 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top