Home > मॅक्स किसान > शेतकऱ्याला कापसाकडून आहे अपेक्षा

शेतकऱ्याला कापसाकडून आहे अपेक्षा

खामगावात कापूस वेचणीला सुरुवात; भाव वाढण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा

शेतकऱ्याला कापसाकडून आहे अपेक्षा
X

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जिनिंग मध्ये कापसाला मोठी मागणी असते. त्यामुळे खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, ढोरपगाव, भालेगाव या परिसरात लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तर जून महिन्यात पेरणी केलेल्या कापूस वेचनीला सुरवात झाली आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे व लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान झाले. आता शेतात काही प्रमाणात राहिलेला कापूस काढण्यात येत आहे. सध्या कापसाला चार ते पाच हजार रुपये भाव सुरू आहे. वेचनीसाठी मजुराला 10 रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागत आहे. शेतातून कापसाचे ढीग घरी नेणे, त्यानंतर मार्केटमध्ये नेणे, हा खर्च लागत आहे. त्यामुळे लावलेला खर्च सुध्दा निघणार की नाही, असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे. तरी हाताशी आलेल्या कापासाला चांगला भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Updated : 11 Oct 2023 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top