Home > मॅक्स किसान > शेतकऱ्याने पपईच्या उत्पादनातून केली लाखोंची कमाई

शेतकऱ्याने पपईच्या उत्पादनातून केली लाखोंची कमाई

शेतकऱ्याने पपईच्या उत्पादनातून केली लाखोंची कमाई
X

अर्धापूर तालुक्यातील डोर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतीमधील वीस गुंठ्यामध्ये पपईची बाग फुलवली आहे. ही पपई 15 नंबर गावरान असून आत्तापर्यंत दीड लाख रुपये या शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं आहे. आणखी दोन लाखापर्यंत रुपये येण्याची अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. या पपई पीकाचे बी कुठल्या दुकानातून घेतलेलं नसून स्वतः शेतकऱ्यांनी तयार केलेले आहे. तरी या प्रगतीशील शेतकऱ्याची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, शेती करत असताना काहीतरी जोडधंदा म्हणून फळपिकांचा प्रयोग करून बघावा. जेणेकरून शेतकरी सुखी समाधानी राहील.

Updated : 6 Nov 2023 4:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top