Home > मॅक्स किसान > शेतकऱ्याने फुलवला कलकत्ता पानमळा

शेतकऱ्याने फुलवला कलकत्ता पानमळा

कलकत्ता पान हे आपल्याकडील पिक नसून बाहेरील राज्यातून त्याला मोठी मागणी..

शेतकऱ्याने फुलवला कलकत्ता पानमळा
X

आधुनिक तंत्राची कास धरत कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न यावं, असा यशस्वी प्रयोग अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केला आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारुन कलकत्ता पान मळ्याची शेती केली आहे. रामचंद्र टिकाराम बरेठीया असे या शेतकऱ्याचे नाव आहे. फळबाग शेतातून समृद्धी साधण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू असतानाच आता शासकीय योजनेच्या पाठबळातून कलकत्ता पान मळ्याची शेती त्यांनी फुलवली आहे. कलकत्ता पान लागवडसाठी त्यांना अडीच लाखांपर्यत खर्च आला असून अकरा महीने पिक मिळणार आणि हा प्रयोग सलग पुढील दहा ते बारा वर्ष चालणार आहे. तर येत्या दोन महिन्यात लागवड खर्चही निघणार असल्याचे बरेठीया यांनी सांगितले. कलकत्ता पान हे आपल्याकडील पिक नसून बाहेरील राज्यातून त्याला मोठी मागणी असल्याचे बरेठीया यांना समजले. आणि या संदर्भात त्यांनी युट्युब वरून आणि उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी, प्रगतिशील शेतकरी यांचे मार्गदर्शन घेतले व सर्व प्रकारची माहिती त्यांच्याकडून समजावून घेतली. आणि पुढे हा प्रयोग त्यांनी आपल्या शेतात केला असे बरेठीया यांनी सांगितले.

Updated : 19 Sep 2023 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top