Home > Top News > Onion Export Ban: 'हा' तर मोदी सरकारचा आत्मघाती निर्णय: मिलिंद मुरुगकर

Onion Export Ban: 'हा' तर मोदी सरकारचा आत्मघाती निर्णय: मिलिंद मुरुगकर

Onion Export Ban: हा तर मोदी सरकारचा आत्मघाती निर्णय: मिलिंद मुरुगकर
X

केंद्र सरकारने जून महिन्यात अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळल्याचं जाहीर करत सरकार कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. याचा ढोल पिटवला होता. मात्र, याच सरकारने आता कांद्यावर बंदी घालत शेतकऱ्यांच्या कष्टांवर पाणी फेरण्याचं काम केल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहे.

कांदा हा महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी एक पीक आहे. कांद्यांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम होतो. हे आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे. त्यातच सरकारने आता कांदा निर्यात बंदी केल्यानं कोरोनामुळे अधिकच संकटात सांपडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

लोकांची क्रयशक्ती घटलेली असताना, शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसताना, अशा प्रकारे निर्यातबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल होईल? या संदर्भात अर्थशास्त्राचे अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना विस्तृत विश्लेषण केलं आहे. पाहुयात काय म्हटलंय मुरुगकर यांनी...

Updated : 16 Sep 2020 2:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top