Home > मॅक्स किसान > ".....आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल", आंबा बागायतदारांचा इशारा

".....आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल", आंबा बागायतदारांचा इशारा

.....आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल,  आंबा बागायतदारांचा इशारा
X

कोकणता गेल्या काही वर्षात सातत्याने येणारी वादळं, अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे फळांचा राजा असलेल्या आंब्यावरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे आंबा बागायतदार व शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागत आहे. वित्तीय संस्था, बँका कर्ज देतात, मात्र त्याची परतफेड कशी करणार हा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे. फेब्रुवारीमध्ये येणारा आंबा मार्चमध्ये बाजारात गेला. मेच्या पहिल्या आठवड्यात 1 कोटी पर्यंतच्या पेट्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातात. आता मात्र केवळ सात ते आठ हजार पेट्या बाजारात जात आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आंब्याने हापुसवर आक्रमण केले आहे. हापूस विक्रीसाठी एपीएमसीमध्ये देखील शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप होतो आहे. अशीच परिस्थिती राहिली तर विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातिल शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर उपासमारीची वेळ येईल आणि आत्महत्या करावी लागेल, असा इशारा शेतकरी देत आहेत.

Updated : 19 March 2022 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top