Home > Economy > अर्थव्यवस्थेची सायकल नीट चालली आहे म्हणजे काय?

अर्थव्यवस्थेची सायकल नीट चालली आहे म्हणजे काय?

देशाची अर्थव्यवस्था नीट चालतेय का? त्याचे निकष काय? हे निकष तुम्हा आम्हाला माहित आहे का? आर्थिक धोरण आणि अर्थव्यवस्थेचे निकष कसे असावे ? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख

अर्थव्यवस्थेची सायकल नीट चालली आहे म्हणजे काय?
X

सायकल नीट आहे की नाही कसे ठरवतात? वाकून टायर दाबून त्यात हवा आहे ना हे बघतात, पॅडल आणि चेन जोरात फिरवून बघतात वगैरे… म्हणजे सगळीकडे बरका; अमेरिकेत, युरोपात, चीनमध्ये, आफ्रिकेत, भारतात सगळीकडे… कार नीट चालत आहे की नाही कसे ठरवतात? रस्त्यावर काढतात, वेग वाढवतात, ब्रेक लावतात, टाकीत इंधन आहे ना हे बघतात वगैरे… म्हणजे सगळीकडे बरका; अमेरिकेत, युरोपात, चीनमध्ये, आफ्रिकेत, भारतात सगळीकडे.

बॉयलर्स, वॉशिंग मशिन्स, वातानुकूलित यंत्रे, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स अशी भली मोठी यादी करा; ते नीट चालत आहेत की नाहीत याचे निकष... वैश्विक आहेत, सर्वत्र आणि सर्वकाळ तेच राहणार आणि ते अगदी अनपढ माणसाला कळतात म्हणजे कोणा एक्सपर्ट ला बोलावून विचारावे लागत नाही की या सायकलला सर्टिफिकेट दे म्हणून...

आणि अर्थव्यवस्था ?

नीट चालली आहे की नाही याचे निकष? ती काय सायकल, कार, बॉयलर, एखाद्या यंत्रासारखी आहे? नीट विचार करा? आपल्या सांगितले गेले की जीडीपी सतत वाढ, अर्थसंकल्पीय तूट, आयात निर्यातीतील तूट, परकीय चलनाची गंगाजळी, सेन्सेक्स नीट असतील तर अर्थव्यवस्था नीट चालली आहे असे समजावे!

पण पहिल्या क्रमांकांच्या अमेरिकन अर्थव्यवस्था नीट चालली आहे की नाही? याचे निकष आणि जगातील अत्यन्तिक गरिबी असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्था नीट चालली आहे की नाही? याचे निकष एकच? यात फरक नको?

बेरोजगारी, स्वयंरोजगारी, त्यातून मिळणारे उत्पन्न पुरेसे आहे किंवा नाही, आरोग्य सेवा व मुलांच्या शिक्षणावर कुटुंबाबाचा वार्षिक उत्पनांच्या किती टक्के खर्च होतो? लहान मुलांना, म्हाताऱ्यांना अर्थाजनासाठी काम करावे लागते का? मुलांचा बॉडी मास रेशो, स्त्रियांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण....

काढा ना मोठी यादी हे अर्थव्यवस्था नीट चालली आहे. याचे निकष का नाहीत? किंवा वरच्या निकषांचा आणि खालच्या निकषांचा संबंध असावा की नसावा? अर्थव्यवस्था नीट चालली आहे याचे निकष देशागणिक आणि काळानुसार बदलले पाहिजेत; उदा. कोरोना ने हाहाकार उडालेल्या अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरी साठी वेगळे निकष हवेत.

राजकीय लोकशाही नांदणाऱ्या आपल्या देशात कोट्यावधी मतदार ठरवणार त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था नीट चालली आहे हे तपासायचे निकष. आर्थिक धोरणे कशी पाहिजे त्यावर विचार करा, ठरवा आणि नेत्यांकडून तुमच्या भौतिक हिताचे आर्थिक निर्णय घडवून आणा.

Updated : 8 July 2021 10:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top