Home > मॅक्स किसान > मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, प्रशासनाकडे केली मदतीची मागणी

मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, प्रशासनाकडे केली मदतीची मागणी

मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, प्रशासनाकडे केली मदतीची मागणी
X

संगमनेर तालुक्याच्या पठारभागात झालेल्या तुफान पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनों पठारभागाकडे लक्ष द्या असा सवालही संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी केला आहे.

पठारभागात झालेल्या तुफान पावसामुळे संगमनेरमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ओढ्या-नाल्यांचे पाणी थेट शेतकर्‍यांच्या शेतात घुसून पिकांमध्ये पाणीच पाणी साचले आहे. तर काही शेतकर्‍यांच्या शेतातील मातीही पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे. त्यामुळे एकामागून एक येणाऱ्या या संकटांनी शेतकरी अक्षरशः बेजार झाले आहेत. ओढे-नाले फुटून शेतांमध्ये पाणी घुसले आहे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याचे शेतकरी सांगत आहे.

अजूनही शेतांमध्ये पाणी साचलेले पाहावयास मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया जातो की काय असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे. प्रशासनाने आम्हाला तात्काळ या परिस्थितीतीमध्ये मदत करावी अशी मागणी केली आहे.

Updated : 13 Sep 2022 8:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top