Home > मॅक्स किसान > डॉ. मेश्राम झाले शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन

डॉ. मेश्राम झाले शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन

डॉ.मिलिऺद मेश्राम यांची क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ च्या सहयोगी अधिष्ठाता पदी नियुक्ती...

डॉ. मेश्राम झाले शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन
X

क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील सहयोगी अधिष्ठाता पदी याच महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख पशुसाथरोग व रोगप्रतिबंधक शास्त्र विभाग डॉ.मिलिऺद मेश्राम यांची नियुक्ती झाल्याचे आदेश दि.३१/१०/२०२३ रोजी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर च्या वतीने निर्गमित करण्यात आले.डाॅ.मेश्राम यांनी दि.१/११/२०२३ रोजी पदभार स्वीकारला आहे.

विद्यमान सहयोगी अधिष्ठाता डॉ.विलास आहेर हे नियत वयोमानानुसार दि.३१/१०/२०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्याने सदरिल पद रिक्त झाले होते.डॉ. मिलिंद दिवाण मेश्राम यांचा जन्म गोदिऺया जिल्ह्यातील तिरोडा या गावी झाला असुन त्यांचे पशुवैद्यकीय पदवी (BVSc & A.H) चे शिक्षण नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे व पदव्युत्तर शिक्षण (MVSc- Medicine) पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे झाले.तसेच ते औषधीशास्त्र या विषयात आचार्य पदवीप्राप्त (Ph.D) आहेत.

त्यांची प्रथम नियुक्ती सहाय्यक प्राध्यापक म्हणून १९९३ साली नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे झाली तदनंतर १९९७ साली त्यांची उपसंचालक संशोधन म्हणून पशुपैदास प्रक्षेत्र, बोरगाव मंजू, जि.अकोला येथे नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यात आली व सन २००६ पासुन ते क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याचा असा ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर ते महाराष्ट्र राज्यातील नामांकित वन्यजीव वैद्यक म्हणून ओळखले जातात. राजीव गांधी प्राणी संग्रहालय व संशोधन केंद्र,कात्रज, पुणे व येथे तज्ञ चिकित्सक व महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध समित्यांमध्ये तज्ञ सल्लागार म्हणून आहेत.

डॉ.मिलिऺद मेश्राम यांनी आजपर्यंतच्या आपल्या सेवा काळात पशुवैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांवर अनेक लेख लिहिले असून त्यांनी विविध ठिकाणी आयोजित त्यांच्या विषय परिषदांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तसेच सेवाभावी संस्था मार्फत चालविल्या जाणार्या गोशाळा व बेवारस जनावरांचे संगोपन करणार्या संस्था मध्ये देखील सेवा देत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी यशस्वीपणे पशुपालन व दुग्धव्यवसाय सुरू केले आहेत.

Tags:

Updated : 2 Nov 2023 5:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top