Home > मॅक्स किसान > दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेवगाव येथे निदर्शनं

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेवगाव येथे निदर्शनं

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेवगाव येथे निदर्शनं
X

अहमदनगर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आठ महिने पुर्ण होत आले आहे. या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शेवगाव तहसील कार्यालयावर केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली, यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणाही दिल्या, तसेच हे काळे कृषी कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी राज्य सचिव सुभाष लांडे, कौन्सिल सदस्य संजय नागरे, बापूराव राशिनकर, कारभारी वीर, संदीप इथापे, भगवानराव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 26 July 2021 12:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top