Home > मॅक्स किसान > CropPlanning तेजी-मंदीच्या सायकलनुसार आले पीक नियोजन..

CropPlanning तेजी-मंदीच्या सायकलनुसार आले पीक नियोजन..

तेजीमंदीचे सायकल आणि त्याचे कन्फर्मेशन देणारे बियाण्याचे रेट हे ढोबळ निकष वापरून त्यांनी मंदीपासून होणारे नुकसान आजवर टाळले आहे..

CropPlanning तेजी-मंदीच्या सायकलनुसार आले पीक नियोजन..
X

भविष्यातील बाजारभावाचा - मार्केट रेट कल (future market trend rate) लक्षात घेवून पिकनियोजन (crop plan) फार महत्वाचे असते अनेकदा मंदीमधे उत्पादन टाळून फायदा मिळवता येणं शक्य आहे. अभ्यासपूर्ण नियोजन निर्णयक्षमता यशस्वी शेतीसाठी महत्वाचं असल्याचं कृषी विश्लेषक दीपक चव्हाण (Dipak Chavan) यांनी म्हटलं आहे.

अंजनडोह (ता.औरंगाबाद) येथील Datta Nana Shejul हे 2022 मध्ये पाच एकर आले लावणार आहेत; चालू वर्षांत एक एकर क्षेत्रात आले बियाणे प्लॉट ते लावणार आहेत. त्यासाठी 1800 रुपये प्रतिक्विंटल रेटने आले विकत घेतलेय.




दत्तानाना सांगतात, "आले पिकांत पाच वर्षांत साधारणपणे दोन-अडीच वर्ष मंदीचे असतात. म्हणून मी तेजी-मंदीचा कालावधी पाहून आले पीक नियोजन करतो. सन 18-19 मध्ये 3500 ते 12000 रू. प्रतिक्विंटलच्या रेंजमध्ये माल विकला होता. मोठ्या तेजीनंतर मंदी स्वाभाविकपणे येणार होती. म्हणून, 2020 व 2021 मध्ये उत्पादन घेतले नाही."




ते सांगतात, "बियाण्याचे भाव महाग होणे हे पुढच्या मंदीचे निदर्शक असते. असे महाग बियाणे घेवून भांडलवदार आले लागण करू लागले समजायचे मोठी मंदी येणार पुढे. असे मालदार लोक आले लागण करतात त्या वर्षी मी आले लावत नाही."

"मंदीचा दोन -अडीच वर्षांचा दीर्घ कालावधी हे देखिल पुढच्या तेजीचे सूचन असते. त्यावर लक्ष ठेवावे. शिवाय पाणीटंचाई आणि पाण्याची मुबलक उपलब्धता हे दोन घटकही महत्त्वाचे असतात."




थोडक्यात, पाच वर्षांतून एकदाच दत्तानाना आले लागण करतात. तेजीमंदीचे सायकल आणि त्याचे कन्फर्मेशन देणारे बियाण्याचे रेट हे ढोबळ निकष वापरून त्यांनी मंदीपासून होणारे नुकसान आजवर टाळले आहे.

(देशात 20-21 पीक वर्षांत 1.7 लाख हेक्टरवर आले पिकाची लागण झाली होती तर 18 लाख टन उत्पादन मिळाल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. )




भविष्यातील बाजारभावाचा - मार्केट रेट कल लक्षात घेवून पिकनियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांत Manoj Bhamare (सटाणा), Shivaji Awate (आंबेगाव) Ajit Korde (फलटण) यांच्याविषयी यापूर्वी लिहिले आहे. प्रत्येक पिकाबाबत अशा नोंदी ठेवून नियोजन करणे गरजेचे आहे. आधीच्या तेजीमुळे 19-20 मध्ये आले लागणी वाढल्या. 2020 मध्ये तर लॉकडाऊनमुळे नव्या शेतकऱ्यांची भर पडली आहे...2020 वर्ष मंदीत गेलेय आणि चालू वर्षांकडून देखिल फारशा अपेक्षा नाहीत, असे दत्तानानांचे म्हणणे आहे. पुढच्या वर्षी आले लागणीच्या क्षेत्र घटल्या बातम्या असतील तेव्हा दत्तानानांचे पाच एकर क्षेत्र लागलेले असेल!


Updated : 11 May 2023 10:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top