Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांनं करून दाखवलं : केळी पट्ट्यात सफरचंदाची लागवड...

शेतकऱ्यांनं करून दाखवलं : केळी पट्ट्यात सफरचंदाची लागवड...

सफरचंद म्हटलं की थंड हवेच्या वातावरणात येणारे फळ, मात्र 40 ते 45 डिग्री तापमाणात सफरचंदाची उत्पादन घेण्याचं धाडस जळगाव जिल्ह्यातील कोचुर येथील एका शेतकऱ्याने केळी पट्ट्यात सफरचंदाची बाग फुलवली आहे. उज्ज्वल पाटील असं त्याचं नाव…

शेतकऱ्यांनं करून दाखवलं : केळी पट्ट्यात सफरचंदाची लागवड...
X

उज्वल पाटील यांनी आपल्या तरुण मुलांच्या मदतीने ही सफरचंदाची बाग फुलवलीये. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचुर गावचे रहिवासी आहेत. शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करायचा, या उद्देशाने त्यांनी एक पाऊल टाकलं. तसं पाहिलं तर केळी पिकवणारा जिल्हा, ही जळगाव जिल्ह्याची खरी ओळख... पण उज्ज्वल पाटील यांनी ही ओळख बदलण्याचा प्रयत्न केलाय. नैसर्गिक संकटं... कमी मिळणारा भाव यासारख्या कारणांमुळे केळी पीक परवडत नाही. त्यावर पर्याय म्हणून त्यांनी सफरचंदाची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय घेतांना त्यांनी बीएसस्सी ॲग्रीचं शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलांची मदत घेतली. मेहनतीच्या बळावर आज त्यांनी सुंदर अशी बाग फुलवलीये.

उज्ज्वल पाटील यांनी एका एकरात सफरचंदाची लागवड केली. दीड वर्षानंतर आता फळं येऊ लागली आहेत. पाटील कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतंय. पण असा नवा प्रयोग मात्र त्यांच्या युवा पिढीने यशस्वी करून दाखवलाय.

शेतीचं काही खरं नाही, असा नाराजीचा सूर आपल्याला सर्वत्र दिसतो. पण पाटील आणि त्यांच्या तरुण मुलांनी शेतीतच सर्व काही आहे, प्रयत्न आणि नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीत यश नक्की येत हेच या शेतकऱ्यांनं दाखवून दिलंय.

Updated : 19 May 2024 5:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top