Home > मॅक्स किसान > पिकांनी टाकल्या माना, शेतकरी चिंताग्रस्त

पिकांनी टाकल्या माना, शेतकरी चिंताग्रस्त

पेरणीपुर्वी उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने पेरणीनंतर तब्बल १ महिन्यापासून दडी मारल्यामुळे ऐन भरात आलेली पिके माना टाकू लागली आहे.

पिकांनी टाकल्या माना, शेतकरी चिंताग्रस्त
X

पेरणीपुर्वी उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने पेरणीनंतर तब्बल १ महिन्यापासून दडी मारल्यामुळे ऐन भरात आलेली पिके माना टाकू लागली आहेत. अगोदर गोगलगाय, पैसा त्यानंतर अळी व आता पावसाची दडी यामुळे पिकाची वाढ खुंटली असून उत्पादन निम्म्यापेक्षा जास्त घटल्याचे दिसत आहे. पेरणीचा खर्चही निघेल का नाही, शेतकरी चिंताग्रस्थ झाला आहे. शासनाने १ रूपयात पिकविमा योजना सुरू केली हे चांगलं आहे. मात्र पहिलेच पैसे आले नाहीत आता काय येणार? निसर्गच कोपला तर काय करणार असा सवाल शेतकरी करत आहेत. विमा नियमानुसार खंड मोजण्यासाठी प्रशासनाकडे मंडळात पुरेशी परजन्यमापक यंत्रणा नाही. सध्याचा पाऊस कुठे पडतो तर पडत नाही त्यामुळे पर्जन्यमापक यंत्रणा अहवाल गृहीत न धरता प्रत्यक्ष पाहणी करून विमा द्यावा, अशीही मागणी उपळा येथील शेतकरी लक्षण लामकाने यांनी केली आहे.

Updated : 29 Aug 2023 12:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top