Home > मॅक्स किसान > अतिवृष्टी पंचनामा नकार भोवला; अधिकाऱ्याची निलंबन

अतिवृष्टी पंचनामा नकार भोवला; अधिकाऱ्याची निलंबन

अस्मानी संकटामुळे ( natural disaster) अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला (farmer)मदत देणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यासाठी आवश्यक पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करणे ही कृषी विभागाच्या जबाबदारी आहे, कोणतेही कारण देत पंचनामा नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही त्यामुळे अपंग शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला निलंबित करा, असे आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar)यांनी दिले आहेत.

अतिवृष्टी पंचनामा नकार भोवला; अधिकाऱ्याची निलंबन
X

अस्मानी संकटामुळे ( natural disaster) अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला (farmer)मदत देणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यासाठी आवश्यक पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करणे ही कृषी विभागाच्या जबाबदारी आहे, कोणतेही कारण देत पंचनामा नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही त्यामुळे अपंग शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला निलंबित करा, असे आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar)यांनी दिले आहेत.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे विभागीय खरीप आढावा बैठकीसाठी (kharip) अलीकडेच नाशिक दौऱ्यावर होते.अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे राज्यभरातील अनेक शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनपातळीवर या नुकसान भरपाई साठी पंचनामे करण्याचे आदेश शासनाने (maharashtra government)दिले आहेत.

शेतकऱ्यांची मागणी असूनही अधिकारी वर्गाकडून पंचनामे करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी सर्रास होत आहेत.कृषी विभागाची यंत्रणा क्षेत्रीय पातळीवर जात नसून एखाद्या ठिकाणी झाडाखाली बसून पंचनामे करत असल्याचा मुद्दा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिशय गंभीरतेने घेतला आहे.

सत्तार म्हणाले, "एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिलेला नाही." त्यावर निफाड तालुक्यातील लोणवाडी येथील अपंग द्राक्षाचे वादळी पावसामुळे मोठे नुकसान होऊनही वेळीच पंचनामा न झाल्याबाबत कृषिमंत्री आक्रमक होऊन कृषी अधिकाऱ्यांवर भडकले. 'नाशिक दौरा संपण्यापूर्वी या पंचनाम्याबाबत माहिती द्या, असे खडेबोल त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

द्राक्ष उत्पादक शेतकरी विजय दौड याच्या द्राक्षमालाला तडे गेल्याने निर्यातक्षम द्राक्ष मातीमोल झाले होते. मात्र त्यांच्या पिकाच्या पंचनाम्यास कृषी सहायकाने टाळाटाळ केली होती. कृषिमंत्र्यांच्या आदेशामुळे आता बेजबाबदार अधिकाऱ्यांची निलंबन होत असून अपंग शेतकरी विजय दौड यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

Updated : 6 May 2023 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top