Home > मॅक्स किसान > दुष्काळ जाहीर करा; लाईट अभावी पिके जाळून खाक

दुष्काळ जाहीर करा; लाईट अभावी पिके जाळून खाक

शेतकऱ्यांना रब्बी व खरीपाचे पीक पाण्याअभावी जळून चालले आहेत तर फळबागा पाण्याअभावी उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आता जगावं कसं त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे

दुष्काळ जाहीर करा; लाईट अभावी पिके जाळून खाक
X

धुळे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढावले आहे. त्यातच विजेच्या अभावी शेत शिवारातील पिके करपली असून नदी नाले, तलाव कोरडे पडले आहेत. त्याचप्रमाणे पुरेसा व सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची अत्यंत पातळी खालावली आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तालुक्यातील आता शेतकरी करू लागले आहे.धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. गेल्या अडीच महिन्यात साधारण 60 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तब्बल एक महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने हाता तोंडाशी आलेली पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. अत्यल्प पावसावर शेतकर्‍यांनी जुलै महिन्यात पेरणी केली. शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होवून बी-बियाणे घेवून पेरणी केली. तुरळक पावसावर पिके जेमतेम तग धरत असताना पुन्हा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आजही शेतकर्‍यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांना रब्बी व खरीपाचे पीक पाण्याअभावी जळून चालले आहेत तर फळबागा पाण्याअभावी उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आता जगावं कसं त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी शांताराम पाटील करीत आहे.


Updated : 8 Sep 2023 4:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top