Home > मॅक्स किसान > Cotton updet : यंदा कापूस उत्पादनात घट

Cotton updet : यंदा कापूस उत्पादनात घट

Cotton कापूस उत्पादनता सर्वात मोठी घट देशात यंदा कापूस उत्पादन cotton production जास्त असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत होते. पण मागील तीन महिन्यांमध्ये कापूस उत्पादनाचे अंदाज कमी होत गेले. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थात सीएआय CAI ने कापूस उत्पादनाच्या अंदाज पुन्हा एकदा कपात केली आहे.

Cotton updet : यंदा कापूस उत्पादनात घट
X


देशात यंदा कापूस उत्पादन cotton production जास्त असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत होते. पण मागील तीन महिन्यांमध्ये कापूस उत्पादनाचे अंदाज कमी होत गेले. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थात सीएआय CAI ने कापूस उत्पादनाच्या अंदाज पुन्हा एकदा कपात केली आहे.





देशातील उत्पादन गेल्या १५ वर्षातील निचांकी पातळीवर lowest level पोचले. देशात यंदा २९८ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचे सीएआयने म्हटले आहे. या अंदाजामुळे कापूस बाजाराला cotton market आधार मिळायला हवा. पण असं होताना दिसत नाही.





देशातील कापूस उत्पादनात यंदाही घट झाल्याचं शेतकरी अगदी सुरुवातीपासून सांगत होते. पण यंदा उत्पादन चांगलं असल्याची रि उद्योगांकडून ओढली जात होती. उद्योगांनी हंगामाच्या सुरुवातीला देशातील कापूस उत्पादन यंदा ३७५ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर ३६५ लाख गाठींचा अंदाज दिला.

देशातील कापूस पिकाला पाऊस आणि कीड-रोगाचा फटका बसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीएआयकडून दर महिन्यातील अंदाजात कपात करण्यात आली. मार्च महिन्यातील अंदाज कापूस उत्पादन ३०३ लाख गाठींवर स्थिरावल्याचे सीएआयने म्हटले होते.





पण एप्रिलच्या अंदाज पुन्हा कपात करून २९८ लाख गाठींवर आणला. म्हणजेच २००८-०९ नंतर सर्वात कमी कापूस उत्पादन चांलू हंगामात झालं. म्हणजेच यंदाच्या हंगामात गेल्या १५ वर्षांतील निचांकी उत्पादन Minimum प्रोडूकशन झाले.

सीएआयने महाराष्ट्र maharshtra आणि तेलंगणातील telangana कापूस उत्पादनाचा अंदाज २ लाख गाठींनी कमी केला. तर तमिळनाडूत ५० हजार तर ओडिशात १५ हजार गाठींनी कपात केली. तर कापूस वापर ३११ लाख गाठींवर पोचेल, असेही म्हटले आहे. गेल्या हंगामात देशात ३१८ लाख गाठी कापूस वापर झाला होता. म्हणजेच यंदा कापूस वापर ७ लाख गाठींनी कमी होणार आहे.

तर उत्पादनात गेल्या हंगामाच्या तुलनेत ९ लाख गाठींनी घट झाली. म्हणजेच भारताच्या कापूस वापरातील घट उत्पादनातील घटीपेक्षा कमी आहे. भारताचा कापूस वापर यंदाही चांगला होणार आहे.

देशातील बाजारात ३० एप्रिलपर्यंत २२४ लाख गाठी कापूस आल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला. म्हणजेच एक मे पर्यंत ६४ लाख गाठी कापूस बाजारात येणे बाकी होते. यापैकी शेतकऱ्यांकडे ५० ते ५५ लाख गाठी कापूस असू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत होते. कापसाची बाजारातील आवक आजही सुरु आहे.

कापूस निर्यातही यंदा निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. गेल्या हंगामात ४३ लाख गाठी कापूस निर्यात झाली होती. ती यंदा २० लाख गाठींवरच स्थिरावेल, असा अंदाज सीएआयने व्यक्त केला. त्यापैकी १२ लाख गाठींची निर्यातही झाल्याचे सीएआयने स्पष्ट केले.

देशातील कापूस उत्पादनाने १५ वर्षांतील निचांकी टप्पा गाठला. त्यामुळे कापसाला चांगाल भाव मिळेल अशी अपेक्षा होती. पण बाजारात दरावरील दबाव आजही कायम होता. कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ९०० रुपये दर मिळाला. बाजारातील कापूस आवकचा दबाव असेपर्यंत दरही दबावात दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस बाजारभाव आणि आयात निर्यात संदर्भात जानकार असलेले महाकॉटन चे सदस्य प्रदीप जैन यांच्या मतानुसार,सुरवातीला शेतकऱ्यांच्या कापूस लागवडीवरून वाटत होत की उत्पादन चांगल निघेल तसंच गेल्या गेल्या हंगामाप्रमाणे कपासाला चांगला भाव मिळेल असं व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांना वाटत होत मात्र अतिऋष्टीमुळे तसंच कापसावरील रोगामुळे कापूस उत्पन्न कमी आलं. गेल्या वर्षी प्रमाणे कापसाचा प्रतिक्विंटल दहा हजार ते अकरा हजार भाव जाईल असा अंदाज असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरातून कापूस काढलाच नाही. यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत कापसाच्या गाठीचे कमी झाल्याचा अंदाज आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या घरात 20 ते 30 टक्के कापूस आहे शेतकरी आता कापूस विक्रीला काढतील की पुढच्या वर्षी हे सांगणं कठीण आहे. अजूनही शेतकऱ्यांना कापसाला भाव वाढेल असच वाटतंय.


Updated : 17 May 2023 9:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top