Home > मॅक्स किसान > कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत...कापूस घरात पडून...

कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत...कापूस घरात पडून...

कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत...कापूस घरात पडून...
X

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यासह जिल्हाभरामध्ये बऱ्यापैकी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करत असतात. यावेळी अवेळी पाऊस आणि अळीचा प्रादुर्भाव अशा संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतले. व्यापाऱ्यांनी कापसाच्या मुहूर्ताचा भाव १४ हजार ते १५ हजार काढला होता. मात्र त्यानंतर आता व्यापाऱ्यांनी कापसाचा भाव झपाट्याने उतरवण्यास सुरवता केली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच व्यापारी आता शेतकऱ्यांकडून तोच कापूस ८ हजार रुपयांपर्यत मागितला जात आहे. शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी लागलेला खर्च, फवारणीचा खर्च काढून शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

व्यापारी ८ हजार रुपये भावाने शेतकऱ्यांचा कापूस मागत असल्याने तो परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापारी जो भाव शेतकऱ्यांच्या कापसाला देत आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचा कापूस लागवडीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने पिकवलेला कापूस व्यापाऱ्यांना कसा द्यायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस भरून ठेवलेला आहे. गेल्या चार महिन्यापासून भाव वाढेल, या अपेक्षेने घरातच कापूस पडून आहे त्याची घट देखील होत आहे.

जेव्हा शेतकऱ्यांनी कापूस काढणीला सुरवात केली होती, त्याचवेळी जर कापसाला भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांनी तात्काळ कापूस विकला असता आणि शेतकऱ्यांना कापूस घरात भरून ठेवण्याची वेळ आली नसती. तसेच शेतकऱ्यांच्या कापसामध्ये घट देखील झाली नसती. परंतु भाव नसल्याने शेतकऱ्यांना कापूस घरात ठेवावा लागत आहे. शासनाने कापसाला हमीभाव दिला तर व्यापारी देखील हमीभावानेच कापूस खरेदी करतील. त्यामुळे भाव कमी जास्त होण्याची वेळच येणार नाही, अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 27 Jan 2023 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top