Home > मॅक्स किसान > हवामान बदल आणि जलसंकट..

हवामान बदल आणि जलसंकट..

जलसंकट (water)ही केवळ आपल्या देशाचीच नाही तर संपूर्ण जगाची समस्या आहे.या बदलत्या निसर्गचक्रावर (climate change) विश्लेषणात्मक भाष्य केले आहे विकास मेश्राम यांनी...

हवामान बदल आणि जलसंकट..
X

संकट (water)ही केवळ आपल्या देशाचीच नाही तर संपूर्ण जगाची समस्या आहे.या बदलत्या निसर्गचक्रावर (climate change) विश्लेषणात्मक भाष्य केले आहे विकास मेश्राम यांनी...

संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणण्यानुसारआ ज जगातील २६ टक्के लोकसंख्येला स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. इतकेच नाही तर येत्या २७ वर्षांत म्हणजे २०५० पर्यंत जगातील १.७ ते २.४ अब्ज शहरी लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. तसेच जगातील ४६ टक्के लोकसंख्या स्वच्छतेच्या माणकापासुन पासून दूर आहे. या संदर्भात युनेस्कोचे महासंचालक आंद्रे अंजोले म्हणतात की, परिस्थिती इतकी गंभीर आहे की हे जागतिक संकट नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी एक मजबूत आंतरराष्ट्रीय व्यवस्था स्थापन करण्याची नितांत गरज आहे. वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट २०२३नुसार, २०३० पर्यंत जगातील सर्व लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छता पुरविण्याचे उद्दिष्ट खूप दूर आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 40 वर्षांत जगातील पाण्याच्या वापराचे प्रमाण दरवर्षी एक टक्क्याने वाढले आहे.जगाची वाढती लोकसंख्या आणि सामाजिक-आर्थिक बदल पाहता 2050 पर्यंत याच पद्धतीने वाढ होणे अपेक्षित आहे. आशिया खंडाचा विचार करता, आशियातील सुमारे 80 टक्के लोकसंख्या विशेषतः ईशान्य चीन, भारत आणि पाकिस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. या संकटाचा सामना करत असलेली जागतिक शहरी लोकसंख्या 2016 मधील 933 दशलक्ष वरून 2050 मध्ये 1.7 ते 2.4 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, ज्याचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. या ग्लोबल वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्टचे मुख्य संपादक रिचर्ड कॅनर यांच्या मते, जर ही अनिश्चितता दूर झाली नाही आणि त्यावर उपाय लवकर सापडला नाही, तर या भीषण जागतिक संकटाला तोंड देणे निश्चितच खूप कठीण होईल. त्यामुळेच पाण्याचा अपव्यय थांबवणे अत्यंत गरजेचे आहे.

हवामानातील बदलांमुळे जगातील जलसुरक्षेला धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे, यात शंका नाही. त्यामुळे जगातील पाच अब्ज लोकांवर हे संकट भयावह रूप धारण करत आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, हवामान बदलाच्या वाढत्या प्रकोपामुळे पाण्याची ही गंभीर स्थिती होत आहे. कारण हवामानाशी निगडीत पर्यावरणीय धोक्यांबाबत अजूनही लोकांना माहिती नसुन एवढेच नाही तर हवामान बदल आणि जलसुरक्षा यांचा संबंधही लोकांना माहीत नाही.

या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी जगातील 142 देशांमध्ये संशोधन केले आणि त्यात कमी उत्पन्न गटातील 21 देश आणि निम्न मध्यम उत्पन्न गटातील 34 देशांचा समावेश करण्यात आला. यामध्ये संशोधकांनी 2019 लॉयड्स रजिस्टर फाउंडेशन वर्ल्ड रिस्क सर्व्हे डेटा देखील वापरला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, येत्या 20 वर्षांत हे संकट भयंकर रूप धारण करेल आणि पाण्याचा लोकांसाठी गंभीर धोका बनेल. संशोधक जोशुआ इनवाल्ड म्हणतात की सर्वात मोठी गरज पर्यावरणीय समस्यांना ठोस आणि प्रासंगिक बनवण्याची आहे तरच काही बदल अपेक्षित आहेत.

ग्लोबल कमिशन ऑन द इकॉनॉमिक्स ऑफ वॉटर, जगातील विज्ञान, अर्थशास्त्र आणि धोरण-निर्धारणातील 17 तज्ञांच्या गटाचा असा विश्वास आहे की सतत वाढत्या उष्णतेमुळे येत्या दोन दशकात पाण्याची टंचाई आणि अन्न उत्पादनात घट होणार आहे, तर भारताला सुध्दा तोंड द्यावे लागेल. 2050 पर्यंत अन्न पुरवठ्यात 16 टक्के कमतरता. व अन्न असुरक्षित लोकसंख्या 50 टक्क्यांनी वाढेल, तर या दशकाच्या अखेरीस जगभरातील ताज्या पाण्याच्या पुरवठ्याची मागणी 40 टक्क्यांनी वाढेल. याशिवाय, चीन आणि अनेक आशियाई देश, जे सध्या अन्न निर्यातदार आहेत, 2050 पर्यंत निव्वळ अन्न आयातदार बनतील. पाणीपुरवठ्याची उपलब्धता लक्षात घेता, आपल्या देशाची पाणीपुरवठ्याची उपलब्धता ११०० ते ११९७ अब्ज घनमीटर आहे, जी २०१० च्या तुलनेत २०५० पर्यंत पाण्याची मागणी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

खरे तर हे संकट सामाजिक आणि आरोग्याचेही संकट आहे. कारण गेल्या 50 वर्षात पूर, दुष्काळ, वादळ आणि तापमानात कमालीची वाढ यासारख्या पाण्याशी संबंधित आपत्तींमुळे जगात सुमारे 2 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाईल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जगातील सुमारे दोन अब्ज लोकांना दूषित पाणी पिण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे जगात पाण्याशी संबंधित आजारांचा धोका वेगाने वाढत आहे. दरवर्षी 14 लाखांहून अधिक लोक जलजन्य आजारांमुळे मृत्युमुखी पडत असल्याची आकडेवारी

समोर आली असून दूषित पाण्याच्या वापरामुळे होणाऱ्या आजारांमुळे ७.४ कोटी लोकांचे आयुर्मान कमी होत आहे. घरांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न होणे हे त्याचे एक कारण आहे.वि

विकास परसराम मेश्राम मु+पो,झरपडा ता अर्जुनी मोरगाव जिल्हा गोदिया मोबाईल नंबर ७८७५५९२८००

ईमेल - [email protected]


Updated : 15 May 2023 2:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top