Top
Home > Max Political > बोगस बियाणे: नाना पेटोले यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये- अनिल बोंडे

बोगस बियाणे: नाना पेटोले यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये- अनिल बोंडे

बोगस बियाणे: नाना पेटोले यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये- अनिल बोंडे
X

राज्यात ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. सोयाबीनच्या पिकावर मराठवाडा, विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. अशा परिस्थितीत राज्यात सोयाबीन चं मोठ्या प्रमाणात बियाणं बोगस आढळल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळलं आहे.

विशेष बाब म्हणजे सरकारच्या महाबीज कंपनीचं बियाणंही बोगस असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करायची की पंचनाम्यांची वाट बघत बसायचं? या संदर्भात आज माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्याशी मॅक्समहाराष्ट्र चे कार्य़कारी संपादक विलास आठवले यांनी ‘बिटवीन द लाईन’ या कार्यक्रमात बातचित केली.

यावेळी अनिल बोंडे यांनी बोगस बियाणे देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवा. सरकारने दुबार पेरणीचं संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. अशी मागणी अनिल बोंडे यांनी यावेळी केली आहे.

तसंच बोगस बियाण्यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र देऊन राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष नाना पेटोले शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी ते तसं करु नये. बियाणे बोगसं निघाल्यानं शेतकरी संतप्त आहेत. अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली आहे.

Updated : 27 Jun 2020 1:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top