Home > मॅक्स किसान > शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका

शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका

गेल्या एक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाची धार वाढत आहे. या आंदोलनात प्रामुख्याने पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्य़ांचचा समावेश आहे. या दरम्यान हरयाणातील भाजप जेजेपी युतीला या आंदोलनाचा फटका बसला आहे. हरयाणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत दोन्ही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका
X

भाजपला सोनीपत आणि अंबालाच्या महापौर पद गमवावे लागले आहे, तर उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाला हिस्सारच्या उकालना आणि धरुहरा भागात महापौरपद गमवाले लागले आहे. हे भाग दोन्ही पक्षाचे बालेकिल्ले समजले जातात.

सोनीपतमध्ये काँग्रेसला 14 हजार मतांनी विजय मिळाला आहे. तर महापौरपदाची मळ काँग्रेस नेते निखिल मदान यांच्या गळ्यात पडणार आहे. शेतकरी आंदोलनामुळे मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली असे मत काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी व्यक्त केले. ज्या भागात काँग्रेसला विजय मिळाला आहे, तो भाग सिंघू बॉर्डर जवळ आहे.

शेतकरी मुद्द्यांवरून भाजपला आतापर्यंत दोन पक्षांनी साथ सोडली होती. भाजपचा मित्रपक्ष जेजेपीवरही मोठा दबाव होता, त्यानुसार पक्षाने शेतकऱ्य़ांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. पण नाराज शेतकऱ्य़ांननी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे हेलिपॅड उधळले होते. तसेच शेतकऱ्य़ांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचीही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. शेतकरी भाजप बरोबरच अदानी आणि अंबानी यांच्या उत्पादनांच्या विरोधातही आक्रमक झाले असून पंजाब आणि हरियाणा मधील अनेक तर लाईनचे मोबाईल टॉवर शेतकऱ्यांनी बंद पडले आहेत. शेतकरी आणि सरकार मधील चर्चेची पुढील फेरी 4 जानेवारी रोजी पार पडणार आहे.

Updated : 31 Dec 2020 2:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top