Home > मॅक्स किसान > बीड शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी...

बीड शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी...

प्रभुरामचंद्रा बद्दल जितेंद्र आव्हाड काय बोलले ते शुद्धीत होते का ? मंत्री धनंजय मुंडे यांची टीका

बीड शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी...
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात कृषी मंत्रालयाने ही योजना चालू केलेली आहे, या योजनेमध्ये जवळपास 63 टक्के काम हे बीड जिल्ह्याने पूर्ण केल्यामुळे देशात पहिला मान बीड जिल्ह्याला मिळाला आहे, बीड जिल्ह्यातील प्रशासनातील प्रत्येक व्यक्तीचे काम आहे की बीड जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी मिळवून देणे हे त्यांचे काम आहे, त्या शेतकऱ्यांना कुठल्याही बँकेत अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि जर अर्ज केला तर बँक दहा कारण सांगते त्याच्यासाठी हा फार्मर आयडी देण्यात येणार आहे, कुठल्याही योजनेचा त्यामध्ये केंद्राची असेल किंवा राज्याच्या असेल ही योजना त्या शेतकऱ्याला घरी बसून घेता येते, त्याच्या खात्यावर त्याच्या डीबीटी अकाउंट वर दिला जातो, शेतकऱ्याला कोणतीही योजना त्याच्या फार्मर आयडीवरून घेता येते त्याच्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. त्या योजनेसाठी बीड जिल्ह्याची निवड केलेली आहे त्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे, आणि बीड जिल्ह्याचे नाव देशाच्या पटलावर घेऊन जाण्याचे काम केलं जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दरम्यान यावेळी मुडें यांनी जितेंद्र आव्हाडांचाही समाचार घेतला ते म्हणाले की "जितेंद्र आव्हाड कशा अवस्थेत बोलले आणि त्यांनी कशा अवस्थेत माघार घेतली, जितेंद्र आव्हाड प्रभु रामांबद्दल काय बोलले कोणत्या अवस्थेत बोलले आणि कोणत्या अवस्थेत माघार घेतली, एखादा माणूस बेशुद्ध अवस्थेत काय बोलतो आणि शुद्धीवर आल्यावर काय बोलतो" अशी टीका मुंडे यांनी केली. ते पुढे म्हणाले की " प्रभू रामचंद्रबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक आगळावेगळे स्थान आहे, प्रभू रामचंद्राच्या बाबतीत चुकीचं बोलू नये, जितेंद्र आव्हाडांचे आजोबा देखील त्यावेळेस काय खात होते हे तरी त्यांना माहित आहे का? प्रभू रामचंद्र बद्दल ते असे का बोलले आणि कोणत्या अवस्थेत बोलले हे तरी त्यांना माहित आहे का ते त्यांच्या सहकाऱ्यांनी विचारणं गरजेचं गरजेचं असल्यांच धनंजय मुंडे म्हणालेत

Updated : 7 Jan 2024 2:19 PM GMT
Next Story
Share it
Top