Home > मॅक्स किसान > जळगावच्या शेतकऱ्याने शोधला शेतीतून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग

जळगावच्या शेतकऱ्याने शोधला शेतीतून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग

तुम्हाला शेतीतून दुहेरी उत्पन्न कसं मिळवावं? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

जळगावच्या शेतकऱ्याने शोधला शेतीतून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग
X

एकीकडे पारंपरिक शेती करणारे शेतकरी (Farmer) तर दुसरीकडे शेतकरी आधुनिक प्रयोगाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळवताना दिसत आहे. अशाच प्रकारे जळगाव (Jalgon)जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील युवा शेतकरी मिलिंद निकम याने शेतीत आंतरपीकाचा प्रयोग केला आहे.

उन्हाळ्यात कलिंगडाला (watermelon) मोठी मागणी असते. मात्र चोपडा येथील युवा शेतकरी मिलिंद निकम (Milind Nikam) याने हिवाळ्यात कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. यासाठी या शेतकऱ्याने सप्टेंबर महिन्यात केळीची (Banana Farming) लागवड केल्यानंतर कलिंगडाची लागवड केली. या आंतरपीक पध्दतीमुळे आपल्याला दुहेरी फायदा होत असल्याचे मिलिंद निकम सांगतात.

पुढे बोलताना मिलिंद निकम म्हणाले, कलिंगडाला सरासरी 19 रुपये दर मिळाला तरी खर्च वजा करून सहा लाख रुपयांपर्यंत एकरी नफा शिल्लक राहतो. यामध्ये एका पिकाला भाव कमी मिळाला तरी दुसरे पीक आधार देते . तसेच मशागतीचा खर्चही दुहेरी पिकामुळे वाचतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आंतरपिकाच्या माध्यमातून फायदा करून घ्यावा, असं आवाहन मिलिंद निकम या युवा शेतकऱ्याने केले आहे.

Updated : 2022-11-05T16:35:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top