Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरिता अटल बांबू समृध्दी योजना

शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरिता अटल बांबू समृध्दी योजना

शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरिता अटल बांबू समृध्दी योजना
X

बांबू ( Bamboo ) हे एक आपल्या दैनंदिन जिवनात बहुउपयोगी असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे, मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला गरिबांचे लाकूड असे हे म्हटले जाते. अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना उती संवर्धित (टिश्यू कल्चर) बांबू रोप पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय ५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

पुर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोप पुरवठा करण्याची तरतूद होती. या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या देखभालीसाठी देखील अनुदान दिले जाणार आहे. आता २ हेक्टर साठी बाराशे रोप लागवड व देखभालीसाठी प्रति रोप १७५ रुपये अनुदान तीन वर्षांत देण्यात येईल.

जुन्या योजनेत एक हेक्टरसाठी ६०० रोपे देण्याची तरतूद होती. शेतकऱ्याला बांबू रोपांच्या बरोबरच निंदनी, पाणी देणे, संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन, शेतकऱ्याला लाभ होईल. बांबू ही अतिशय जलद वाढणारे सदाहरित व दीर्घायुषी प्रजाती आहे बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळण्याची मोठी क्षमता आहे.

अटल बांबू समृध्दी योजनेची उदिष्टे

शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा जोड देण्यासाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडीखाली क्षेत्र वाढविणे, बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यास उपजीविकेचे साधन निर्माण करणे व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे अशी या

शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा जोड देण्यासाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडीखाली क्षेत्र वाढविणे, बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यास उपजीविकेचे साधन निर्माण करणे व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे अशी या atal bamboo samruddhi scheme योजनेची उदिष्ट आहेत.

बांबू लागवडीचे फायदे

बांबू प्रजातीचे जीवन चक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. अन्नधान्य तसेच भाजीपाल्याप्रमाणे दरवर्षे बांबू लागवड करण्याची गरज नाही बांबूंचे जीवन चक्र म्हणजेच बांबूला फुलोरा येईपर्यंत बांबू जिवंत असतो. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होत असतात.

पाणी साचलेल्या पाणथळी जमिनीवर, खरपाड युक्त जमीन, क्षारयुक्त जमीन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते, तर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर 30 ते 40 टक्के कमी खर्च येतो. पहिल्या व दुसऱ्या वर्षीचे बांबू सोडून तिसऱ्या वर्षानंतर बांबू काढता येत असल्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळवू शकते. बांबू लागवडीमुळे शेत जमिनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा सुद्धा फायदा मिळतो. बांबूच्या कोंबा पासून पानापर्यंत 26 मूल्यवर्धक उत्पादने तयार करण्याची क्षमता बांबूंमध्ये आहे.

उदाहरणार्थ – बांबू कोंबा पासून लोणचे ,भाजी, लाकूड, पडदे, फर्निचर , अगरबत्ती, कापड , ऊर्जा ( Bamboo charcoal )इत्यादी यामुळे बांबूंचा कच्चामाल उपलब्ध होण्याकरता शेतकऱ्यांना शेतामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यास प्रोत्साहित करणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे व पर्यावरण पूरक आहे.

योजनेसाठी मिळणारे अनुदान

टिशू कल्चर बांबू रोपांचा दर अंदाजे रुपये 25 प्रतिरोप आहे. शेतकरी प्रथम बांबू रोप खरेदी करून त्यांचे शेत जमिनीवर लागवड करतील अशा जमिनीवर केलेल्या बांबू लागवडीचे तपासणीनंतर बांबू रोपांचे किमती पैकी शासनाकडून 4 हेक्टर किंवा त्याखालील शेती असलेल्या जमीन धारकांना ८०% तर ४ हेक्टर पेक्षा अधिक शेती असलेल्या भूधारकांना ५०% सवलतीच्या दराने सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. तर उर्वरित बांबू रोपांची किंमत अनुक्रमे 20 व ५० % प्रमाणे खर्च हा शेतकऱ्यांनी हे स्वतः करावयाचा आहे.

लाभार्थी निवड

शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराने बांबू रोप मिळवण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात दस्तावेजासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्याची निवड करण्याकरिता खालील प्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहे.

शेतीचा गाव नमुना सातबारा 7/12

आधार कार्ड ची प्रत

गाव नमुना ८ गाव 8a

नकाशा ची प्रत

ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत यांच्याकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला

बांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी ठिबक सिंचन.

बांबू रोपे लहान असताना डुकरापासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण कुंपणाची सोय असल्याबाबतचे हमीपत्र.

बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत कोऱ्या धनादेशाची छायांकित प्रत अर्जदार शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार क्रमांक जोडून घेणे आवश्यक राहील.

अर्ज सादर करण्यासाठी खालील संकेतस्थळावर क्लिकवर करावे

https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp

Updated : 7 Feb 2024 1:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top