Home > मॅक्स किसान > भुकबळी पासून भुकमुक्ती कडे देशाला नेणारे कृषी महर्षी - एम.एस.स्वामिनाथन

भुकबळी पासून भुकमुक्ती कडे देशाला नेणारे कृषी महर्षी - एम.एस.स्वामिनाथन

भुकबळी पासून भुकमुक्ती कडे देशाला नेणारे कृषी महर्षी - एम.एस.स्वामिनाथन
X

एम.एस.स्वामिनाथन हे कृषी क्रांतीचे जनक होते त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची घोषणा झाली आहे. आपल्या कृषी क्षेत्रात त्यांनी पारंपरिक विचारसरणीत आमुलाग्र बदलून आणले. केवळ व्याप्तीच बदलली नाही, तर सुधारित बियाणे आणि कृषी उपकरणे देऊन शेतीशी संबंधित विचार समृद्ध करण्याची आधुनिक दृष्टी दिली. स्वामिनाथन यांनीच आपल्या देशात उच्च उत्पादकतेसाठी प्रयत्न सुरू केले. ज्या वेळी देशाला दुष्काळाचा सामना करावा लागत होता, त्या वेळी स्वामीनाथन यांनी तांदूळ आणि गव्हाच्या सुधारित वाणांवर संशोधन करण्यावर भर दिला. लागवडीखालील जमिनीची सुपीकता लक्षात घेऊन उच्च उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या जाती, खतांचा योग्य वापर आणि अधिक प्रभावी कृषी तंत्र यांचा मेळ घालून देशातील गव्हाचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. उत्पादनात वाढ व्हावी म्हणून केवळ गव्हावरच नव्हे तर भातशेतीवरही असे प्रयोग केले गेले. गव्हाचे मेक्सिकन बियाणे पंजाबच्या देशी वाणांमध्ये मिसळून त्यांनी संकरित वाण विकसित केली. त्यांनी घेतलेल्या या पुढाकारातूनच देशातील अन्नधान्य टंचाई दूर करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.भारतरत्न पुरस्कार हा त्यांचा साठी एक आदरांजली आहे.कारण त्यांनी आयुष्यभर भुक मुक्ती साठी कार्य केले.

कृषी क्षेत्रात भारताला नवी दृष्टी, नवा विचार दिला, यासह त्यांच्या अद्वितीय प्रतिभेने समृद्ध करण्याचे काम केले. या दृष्टीकोनातून पाहिले तर स्वामीनाथन यांचे देशासाठीचे योगदान विलक्षण आहे. त्यांनी देशाला भारतीय शेतीच्या गुंतागुंतीचा सखोल अभ्यास करून दिला. सिंचनाच्या साधनांचा अभाव, जमिनीच्या सुपीकतेतील तफावत, सेंद्रिय खतांचा वापर करूनही उत्पादनात होणारी घट आणि पीक उत्पादनाचा नीरस दर यामुळे शेती करणे कठीण बनले होते.

उत्पादनात घट होण्याचा कल समजून घेऊन असे संशोधन कार्य केले गेले, ज्यामुळे देशातील कृषी उत्पादनात सातत्याने वाढ होईल. तांदळाचे उत्पादन आणि त्याच्या उत्पादनाची वास्तविक परिस्थिती यांचा अभ्यास करून त्यांनी पिकांची स्थापना केली, पीक पद्धतीमध्ये वैविध्य आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी ज्या भागात धान्याचे मुबलक पीक घेतले जाते, त्यांची आकडेवारी गोळा केली. त्यांचा अभ्यास केला आणि जागतिक स्तरावर त्यांची लागवड केली भारतासारख्या भौगोलिक विषमता असलेल्या देशात शेती करणे फायदेशीर ठरेल, यासाठी अशा प्रकारचे बी-बियाणे, खते आणि कृषी उपकरणे यांचा समन्वय साधून प्रयोग केले. आपण कृषी उत्पादनात स्वावलंबन वाढविला हे सगळे त्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे.

अशा प्रकारे देशात हरितक्रांतीची सुरुवात झाली. पण ते सोपे नव्हते, यासाठी त्यांनी देशभरातील लोकांना कृषी विचारांच्या अशा मॉडेलवर काम करण्यासाठी प्रेरीत करून युवा कृषी संशोधकांना पुढे आणले .यासोबतच देशाने कृषी क्षेत्रात प्रगत आधुनिकतेकडे वाटचाल केली. एम .एस.स्वामीनाथन हे केवळ कृषी शास्त्रज्ञच नव्हते तर आपल्या विचारांशी ठाम राहणारे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते. जादा उत्पादनामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात शेतमाल विकावा लागला नाही पाहिजे यासाठी, पण त्यांचा प्रयत्न होता. कृषी साठवणुकीसह विपणनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती फायदेशीर करण्यावर त्यांनी भर दिला. तर, कृषी क्षेत्रातील बड्या उद्योजकांच्या सहभागातून त्यांनी भारतीय शेतीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक असताना त्यांनी देशात नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट, ॲनिमल अँड फिश जेनेटिक्सची स्थापना केली. तृणधान्यांचे उच्च उत्पादन देणारी पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले, खते आणि कीटकनाशकांच्या योग्य वापराद्वारे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मोहीम राबवली आणि जैव-विविधता व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. नव्वदच्या दशकात त्यांनी चेन्नईमध्ये कृषी आणि ग्रामीण विकास या अंतर्गत एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. याद्वारे त्यांनी ग्रामीण भागात महिला केंद्रित आर्थिक उपक्रमांना चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम बनवण्याचे महत्त्वाचे काम केले.

स्वामीनाथन यांचे भारतीय कृषी क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी कृषी क्षेत्रातील विचारांची दिशा बदलली. देशाला हरितक्रांतीची देणगी दिली आणि कृषी संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले आणि भारतीय शेतीला समृद्धीच्या मार्गावर नेले.

विकास परसराम मेश्राम

मो. नं. 7875592800

[email protected]

Updated : 11 Feb 2024 2:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top