Home > मॅक्स किसान > शेतमालातील पॅनिक किंवा चुकीच्या सेलिंग नको: दिपक चव्हाण

शेतमालातील पॅनिक किंवा चुकीच्या सेलिंग नको: दिपक चव्हाण

शेतमालातील पॅनिक किंवा चुकीच्या सेलिंग नको: दिपक चव्हाण
X

शेतमालातील पॅनिक किंवा चुकीच्या सेलिंगमुळे स्टॉकिस्टचा फायदा होतो. शेतकरी व एंड युजर्सला फटका बसतो. सोयाबीन मार्केटबाबत 4 ऑक्टोबरला फेसबुक पोस्टद्वारे "घाई करू नये. थांबून जावे," असे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यानंतर जे थांबले त्या शेतकऱ्यांना किमान 300 रुपये जास्तीचा दर आज मिळतोय. तेव्हा थांबा असे सांगितले, कारण त्यामागे जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील मूलभूत परिस्थितीचा भक्कम आधार होता. आता विकावे का? भाव वाढतील का? : नेमके, खात्रीशीर उत्तर माझ्याकडे नाही.

जेव्हा स्पष्टता होती, तिथे सांगू शकलो. हिंगोलीत 4 ऑक्टोबरला 10 - 12 टक्के आर्द्रतेच्या मालाचा भाव 3600 होता. आज तो 4050 आहे. म्हणजे, 3600 वरून 4050 मार्केट सुधारले. प्रतिक्विंटल किमान दहा टक्क्यांचा फायदा झाला. आता येथून पुढचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. तरीही तुम्ही काय केले असते? : सध्याच्या पातळीवर किमान 20 ते 25 टक्के माल विकला असता. कारण मी 4 ऑक्टोबरनंतर - जवळपास महिनाभर संयम पाळला आणि थांबलो. त्याचा फायदा झाला आहे.

agri-commodity-panic-wrong-selling-benefit-stockist-harms-farmersआता, आर्थिक निकडीनुसार किमान 20 ते 25 टक्के माल विकणे क्रमप्राप्त आहे. शिवाय, या निर्णय मागे (जागतिक व देशांतर्गत) बाजारभाव आधारपातळी (सपोर्ट) व प्रतिरोध ( रेजिस्टंट) यासारख्या तांत्रिक व मूलभूत विश्लेषणातील कसोट्यांचे इनपूट्स आहेत. यातही वरील निर्णय़ बरोबर ठरेल, असा दावा नाही.

जगात सर्वाधिक सोयाबीन पिकवणाऱ्या ब्राझिलमध्ये आता पेरणी सुरू आहे. तिथल्या पाऊसमानानुसार जागतिक व भारतीय सोयाबीन बाजाराची दिशा ठरेल. हे यासाठी सांगितले, की सालाबादाप्रमाणे काही लोकांनी यंदाही सोयाबीनबाबत विशिष्ट भावपातळीच्या धारणा ठेवल्या आहेत. त्यांच्या धारणांनुसार जर ब्राझिलमधील पाऊसमान बदलत असेल, तर चांगलेच आहे.

Updated : 30 Oct 2020 9:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top