Home > मॅक्स किसान > सोलापूर पाठोपाठ जळगाव देखील लंपीच्या प्रभावाखाली, शेतकऱ्यांसमोर नवं संकट...

सोलापूर पाठोपाठ जळगाव देखील लंपीच्या प्रभावाखाली, शेतकऱ्यांसमोर नवं संकट...

सोलापूर पाठोपाठ जळगाव देखील लंपीच्या प्रभावाखाली, शेतकऱ्यांसमोर नवं संकट...
X

सोलापूर नंतर आता राज्यभर लंपी या आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला पाहायला मिळतंय. जळगावात देखील पशुंना लंपी आजाराची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत ५६५ जनावरांना या आजाराची लागण झाली असली तरी ३६३ जनावरे या आजारातुन बरी झाली असून १७९ जनावरांवर उपचार सुरू आहे. तर २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंपी या आजाराची लागण जनावराला झाल्यास आणि प्रशासनाला माहिती न देता त्यावर खासगी वैद्यकीय व्यावसायिकाने उपचार केल्यास त्यांच्यावर जबाबदारी निश्‍चित केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जनावरांमध्ये आढळुन येणार्‍या लंपी या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यामध्ये एकुण ३३ क्षेत्र लंपी आजाराने बाधित असुन त्यामध्ये एकुण पशुधन संख्या १२५९८८ ईतकी आहे. त्यापैकी १११८०२ लसीकरण पुर्ण झालेले आहे. सध्या जिल्हयामध्ये २०२००० लससाठा शिल्लक आहे. जिल्हयातील सर्व जनावरांचे बाजार बंद करण्यात आलेले आहेत. जळगांव जिल्हयाच्या लगत असलेली मध्यप्रदेश राज्याची सीमा त्यातुन होत असलेली जनावरांची वाहतुक पुर्ण पणे बंद करण्यात आलेली आहे. सार्वजनीक चराई कुरण पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहे.

जिथे एकत्र पाणी पिण्याची हौद पुढील १५ दिवसांसाठी बंद करण्यात आलेले आहेत. त्याच प्रमाणे खाजगी पॅरावेटस व पशुपालकांना लंम्पी रोग सदृश्य लक्षणे दिसताच १९६२ यानंबरवर तात्काळ कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाधित जनावरांचे उपचार हे पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्फत किंवा मार्गदर्शनाखाली करण्यात यावे. खाजगी पॅरावेटस यांनी परस्पर उपचार केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. गोठा स्वच्छता व गोचिड निर्मुलन मोहिम ग्राम पंचायतीच्या मदतीने व पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने करण्यात यावी. या आजाराने मृत झालेल्या जनावरांचे शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात यावे. तरच शेतकर्‍यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१० हजाराची मदत देण्याची कार्यवाही सुरू

राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील यांनी मयत जनावरांच्या पशुपालकांना तातडीची मदत म्हणून १० हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ही मदत देण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी दिली. तसेच नैसर्गिक आपत्तीबाबतही प्रस्ताव देण्यात आला आहे.

Updated : 13 Sep 2022 6:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top