Home > मॅक्स किसान > शोभायात्रा ठरली अंत्ययात्रा...

शोभायात्रा ठरली अंत्ययात्रा...

शोभायात्रा ठरली अंत्ययात्रा...
X

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे शोभा यात्रेत शेतकऱ्यांची व्यथा मांडताना तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. मनोज धुर्वे असं २७ वर्षीय मृत तरूणाचं नाव असून हा तरूण शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी चित्ररथावर अभिनय करत होता . दरम्यान शेतकरी आत्महत्येची व्यथा मांडण्याचा अभिनय करताना त्याने आपल्या गळ्यात गळफास लावून घेतला. त्याच गळफासानं या शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे. शेतकऱी नांगराला लटकवलेला फास गळ्यात लावून मनोज शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा अभिनय करत होता. मात्र शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱी शोभा यात्रा मनोजची अंत्ययात्रा ठरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Updated : 4 Nov 2017 6:53 AM GMT
Next Story
Share it
Top