Home > मॅक्स किसान > विदर्भात अतिवृष्टीचा फटका सोयाबीन पिकाला...

विदर्भात अतिवृष्टीचा फटका सोयाबीन पिकाला...

विदर्भात अतिवृष्टीचा फटका सोयाबीन पिकाला...
X

यंदा विदर्भात अतिवृष्टीमुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीनच्या पिकाला बसला आहे. एकूण लागवडीच्या सुमारे ४९ टक्के क्षेत्र अतिवृष्टीने प्रभावित झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडाला शेतक-यांच्या तोंडचा घास पळाला आहे.

अगोदर पाऊसाने दडी मारल्याने पिकाला फटका बसला होता, त्यातच सोयाबिनला थोड्या फार शेंगा लागलेल्या असताना विदर्भात झालेल्या अतिवृष्टीने ऐन दिवाळीत शेतक-यांचं दिवाळं निघालं आहे. विशेष बाब म्हणजे कृषी विभागाचे कोणतेही अधिकारी अद्यापपर्यंत शेतक-यांच्या पिकाकडे फिरकलेले देखील नाही.

https://youtu.be/lNQzzbcrLQE

Updated : 6 Oct 2017 12:09 PM GMT
Next Story
Share it
Top