Home > मॅक्स किसान > 'पांढऱ्या सोन्याचा भाव गुजरातच्या हातात'

'पांढऱ्या सोन्याचा भाव गुजरातच्या हातात'

पांढऱ्या सोन्याचा भाव गुजरातच्या हातात
X

महाराष्ट्र सरकारने कापूस खरेदी न केल्याने महाराष्ट्रातील शेतक-यांना ऐन दिवाळीत कमी भावात व्यापा-यांना कापूस विकावा लागला आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने कापूस खरेदी सुरू न केल्याने गुजरातमधील व्यापारी आता पैशाने अडलेल्या महाराष्ट्रातील शेतक-यांचा कापूस खरेदी करत आहे.

दरम्यान राज्य सरकारने कापूस खरेदी न केल्याने शेतक-यांचे अमाप नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने कापसाची लवकरात लवकर खरेदी करावी अशी मागणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली आहे. तसचं यावेळी विरोधात असताना कापसाला ७ हजार रूपये भाव देण्याची मागणी करणा-या गिरिष महाजन यांचा देवकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Updated : 24 Oct 2017 3:19 PM GMT
Next Story
Share it
Top