Home > मॅक्स किसान > दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन दराने केला घात !

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन दराने केला घात !

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन दराने केला घात !
X

सोयाबीन पीकाला दोन हजारांपासून मागणी सुरु आहे. ऐन सणासुदीला शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. मूग, उडदापाठोपाठ आता सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात येणे सुरु झाले आहे. आवकेला नुकतीच सुरुवात झाली असताना दरांमध्ये कमालीची घसरण सुरु झाली आहे. सोयाबीनची खरेदी अवघी दोन हजार रुपयांपासून केली जात असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी वर्ग संकटांमध्ये सापडला आहे.

वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या याच दरांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. तर केंद्र सरकारकडून पुढील काही दिवसांत बफर स्टॉकमधील सात लाख टन कडधान्यांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. सात लाख कडधान्यांपैकी साडेतीन लाख टन कडधान्ये गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू आदी राज्यांना आणि उर्वरित साडेतीन लाख कडधान्ये साठा खुल्या बाजार योजनेअंतर्गत विकला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.

सध्या देशात १.८ दशलक्ष टन कडधान्यांचा बफर स्टॉक पडून आहे. बफर स्टॉकमधील कडधान्ये पुरवठा करण्याची मागणी तीन राज्यांनी केंद्राकडे केली आहे. त्यानुसार त्यांना कडधान्ये पुरवठा केला जाणार आहे. याबाबत येत्या एक-दोन दिवसांत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

देशात २०१६-१७ मध्ये विक्रमी २२.९५ दशलक्ष टन कडधान्ये उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. बंपर उत्पादनानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत २ दशलक्ष टन कडधान्यांचा बफर स्टॉक केला होता. कडधान्यांचा हा साठा खराब होऊ नये यासाठी त्यासाठी तो आता विकण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

Updated : 17 Oct 2017 11:05 AM GMT
Next Story
Share it
Top