Home > मॅक्स किसान > "चकवा"फेम दानवेनी शेतकऱ्यांच्या "भानगडीत" पडू नये...

"चकवा"फेम दानवेनी शेतकऱ्यांच्या "भानगडीत" पडू नये...

चकवाफेम दानवेनी शेतकऱ्यांच्या भानगडीत पडू नये...
X

जगप्रसिद्ध "चकवा"कार दानवेनी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱयांच्या घामाला दाम द्यायचे सोडून जी काही मस्तवाल बैलासारखी मुक्ताफळे उधळली आहेत त्याने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे. राज्यभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु असताना शेतकऱयांना कर्जमुक्ती आणि पिकाला हमीभाव द्यायचे सोडून भाजपच्या या "चकव्या" प्रदेशाध्यक्षाने अकलेचे तारे तोडत शेतकऱयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

मुळातच आपण कोण, आपली लायकी काय याची ज्याची त्याला माहिती असली पाहिजे. पण, औकात नसताना जास्तीचे नशिबात आल्यानंतर संधीसाधूंची जी अवस्था होते तिच या दानवेची अवस्था झाली आहे. त्यामुळेच अन्नदात्यांना "साले" म्हणण्यापत यांची जीभ वळवळ करते.

खरंतर हा "चकवा"कार दानवे गोपीनाथ मुंडेंचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून प्रदिद्ध होता. मात्र गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर मुंडेंच्या सर्व समर्थकांची होरपळ होत असताना या दानवेनी मात्र लागलीच 'मुंडे विरोधी गटाशी' जुळवून घेत सरड्यासारखे रंग बदलले आणि स्वतःची पोळी भाजून घेतली.

या "चकवा"कार दानवेचा "चकवा" जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांना माहित आहे. एका सभेला उपस्थित असलेले दानवे डायरेक्ट तिसऱ्या सभेला हजर होतात. दुसऱ्या सभेच्या वेळी दानवेनी कार्यकर्त्यांना "चकवा" दिलेला असतो. हा "चकवा" "थकवा" घालवण्यासाठी असतो हे आता सर्व कार्यकर्त्यांना माहित झालेले आहे.

"तोंड मारण्याच्या" दानवेच्या या "चकवा"कार वृत्तीमुळे मोदी साहेबांनी त्याची केंद्रातून मंत्रीपदावरून हाकालपट्टी केली आणि राज्यातील मंत्रीपदातही स्थान देण्यात आले नाही. तरी "चकवा"कार दानवेला शहाणपण आलेले नाही. 4 वेळा आमदार 2 वेळा खासदार झालेल्या या दानवेला जनतेशी-शेतकऱयांची कसे बोलायचे याची साधी अक्कल असू नये याचेच आश्चर्य वाटते.

"भानगडींसाठी" प्रसिद्ध असणाऱ्या या दानवेनी आता शेतकऱ्यांशी पंगा घेत नवीन भानगड सुरु केली आहे. यांच्या खाजगी भानगडी पचल्या पण ही शेतकऱ्यांशी केलेली "भानगड" या दानवेला किती जड जाईल हे त्याला अजून माहीत नाही. कारण, आम्हा शेतकरयांच्या वावरातला "बांध वा बांधाचा दगड" जरी कोणी इकडेतिकडे केला तरी "भानगडी" होतात. आम्ही कोणाला सोडत नाही. दानवे तू तर याहून मोठी "भानगड" उकडून काढलीयस.

एकीकडे शेतमालाला हमीभाव नाही, नापिकीपणा, कर्जबाजारीपणा यामुळे पोराबाळांच्या शिक्षणासाठी-लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून शेतकरी आत्महत्या करत असताना आणि हे लोण शेतकऱयांच्या पोरा- बाळांपर्यंत पसरत असताना हा मस्तवाल दानवे मात्र आपल्या पोराच्या शाही विवाहासाठी 25 कोटी रुपये खर्च करत होता. 'कष्टाने कमावलेले पैसे खर्च करायला काय हरकत आहे' असा माध्यमांसमोर युक्तिवादही करत होता. बाबारे तू असे कुठले कष्टाचे धंदे करत आहेस ते आम्हा शेतकऱ्यांनाही एकदा सांग. आम्हीही आत्महत्या न करता तुझ्यासारखे कष्ट करत पोराबाळांची लग्न धुमधडाक्यात करू. कष्टाने कोट्याधीश होऊ हा आमचा साधा सवाल या "चकवा"काराला आहे.

या "चकवा"काराचे किती फ्लॅट मुंबईत आहेत. त्यातले किती त्याच्या कुटुंबाला माहिती आहेत?? ते कुठल्या "उद्योगातून" मिळावलेत? आणि तिथे कोणते "उद्योग" चालतात हेही जगजाहीर होणे गरजेचे आहे.

राज्यभरात मराठा मोर्चे निघत असताना आणि भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत असताना एकाएकी या संधीसाधू "रावसाहेबांना" पक्षात महत्व प्राप्त झाले. आणि त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली. त्याचीच हवा डोक्यात गेल्याने या भ्रमिष्ट आणि सडक्या डोक्यातून अन्नदात्याविषयी अपशब्द बोलण्याची याची हिम्मत होते.

"सुचिता आणि सहिष्णुता" शिकवणाऱ्या भाजपासारख्या पक्षाने जनतेच्या भावनांशी जो काही खेळ मांडला आहे तो काही बरोबर नाही. या "तुरीची" किंमती तुम्हाला मोजावी लागेल. हा बिनबुडाचा प्रदेशाध्यक्षही तुम्हाला लखलाभ. या दानवेचा राजीनामा घ्यावा न घ्यावा. आम्हाला हमीभाव द्यावा न द्यावा. पण, आता आमच्या मनगटात इतकी ताकद भरली आहे की ही भ्रमिष्ट मस्तके आम्ही ठेचल्याशिवाय रहाणार नाही. आमची मस्तके आणि मनगटे आता "बारुद" भरून मजबूत व्हायला लागली आहेत. कारण, आता शेतकरी कट्टरवाद सुरु झाला आहे. तुमच्या 'चकव्या’ला आम्ही रंगवल्याशिवाय रहाणार नाही.

-- अॅड.विवेक ठाकरे

नोट - वरील लेखातील मुद्दे हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. मॅक्स महाराष्ट्र लेखकाच्या मतांशी पुर्णतः सहमत असेलच असे नाही.

Updated : 14 May 2017 11:45 AM GMT
Next Story
Share it
Top