Home > मॅक्स किसान > अर्ध्या किलो मटनापेक्षाही 100 किलो सोयाबीन स्वस्त!

अर्ध्या किलो मटनापेक्षाही 100 किलो सोयाबीन स्वस्त!

अर्ध्या किलो मटनापेक्षाही 100 किलो सोयाबीन स्वस्त!
X

राज्यात मटनाचा दर 440 रुपये किलो आहे, म्हणजे अर्धा किलो मटनासाठी आपल्याला 220 रुपये मजोवे लागतात, पण अर्धा किलो मटनाच्या दरापेक्षाही कमी पैशात तब्बल 100 किलो सोयाबीनची विक्री झाली. यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या निच्चांकी दराचा हा विक्रम वर्धा जिल्ह्यातील सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला चक्क 200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. सोयाबीन उत्पादकांची थट्टा करण्याचा हा कळस आहे. यंदा सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झालीय, यंदा हमीभावापेक्षाही कमी दराने म्हणजे सोयाबीनला 1400 ते 2300 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. यात उत्पादन खर्चही निघत नाही, पण सर्वात मोठा कळस

म्हणजे सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चक्क 200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, परतीच्या पावसामुळे या सोयाबीनमध्ये मातीचं प्रमाण आणि ओलावा होता. पण तरिही प्रति क्विंटल 200 रुपये दर हा शेतकऱ्यांची थट्टा करणारा आहे.

केंद्रीय कृषीमुल्य आयोगाने सोयाबीनचा हमीभाव 3050 रुपये प्रति क्विंटल ठरवलाय, पण यंदा राज्यातल्या कुठल्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हमीभावाने सोयाबीनची खरेदी केला जात नाही. हमीभावापेक्षा कमी दरानं विक्री होत असेल तर सरकारी हस्तक्षेपाची गरज असते. मात्र सरकार हस्तक्षेप करत नसल्यानं बाजारात शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. या लूटीचा विक्रम झालाय वर्धा जिल्ह्यातील सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झालाय. इथे सोयाबीनला यंदाचा निच्चांकी म्हणजेच प्रति क्विंटल 200 रुपये दर मिळाला आहे. म्हणजेच अर्धा किलो मटनच्या दरापेक्षाही इथे 100 किलो सोयाबीनला कमी दर

मिळाला आहे. अशीच स्थिती असेल तर मग वारंवार कर्जमाफीची वेळ येणार नाही, तर काय होणार? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करतायत.

Updated : 30 Oct 2017 9:57 AM GMT
Next Story
Share it
Top