Home > मॅक्स एज्युकेशन > काय आहे शिक्षण विभागाचा अंडे का फंडा?

काय आहे शिक्षण विभागाचा अंडे का फंडा?

काय आहे शिक्षण विभागाचा अंडे का फंडा?
X

११ आॅक्टोबरपासून ग्रामीण भागातील शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शक्यतो शिक्षकांची धावपळ ही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किंवा परीक्षा घेण्यासाठी होत असावी असे आपल्याला वाटते परंतू नव्हे - नव्हे ही धावपळ चक्क अंडी गोळा करण्यासाठी सुरु होती.

१२ आॅक्टोबरच्या 'जागतिक अंडे दिना'निमित्त राज्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण व जिल्हा रुग्णालये आदी ठिकाणी तब्बल ३० लाख अंडी वाटण्याचे उद्दिष्ट कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला व बाल कल्याण विभागाने ठेवले आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश काढले आहेत. तसेच लोकसहभागातून शिक्षकांना अंडी गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी 'जागतिक अंडे दिन' साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाचा या आयोजनात समावेश केला आहे. परंतू मुख्याध्यापकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे, एवढी अंडी उपलब्ध करुन द्यायची कशी? लोकसहभाग मिळवून विद्यार्थ्यांना अंड्यांचा लाभ देऊन त्याचा अहवाल केंद्र प्रमुखांकडे सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Updated : 12 Oct 2018 8:16 AM GMT
Next Story
Share it
Top