Home > मॅक्स एज्युकेशन > शिवसेनेच्या विद्यार्थी विभागाचा गोवा विद्यापीठाला इशारा

शिवसेनेच्या विद्यार्थी विभागाचा गोवा विद्यापीठाला इशारा

शिवसेनेच्या विद्यार्थी विभागाचा गोवा विद्यापीठाला इशारा
X

गोवा विद्यापीठात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यार्थी विभागाने गोवा विद्यापीठाच्या निवडणुका १५ दिवसाच्या आत जाहीर न केल्यास विद्यापीठावर मोर्चा काढला जाईल असा इशारा दिला आहे. कारण दरवर्षी प्रमाणे जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये गोवा विद्यापीठाच्या निवडणूका होत असतात. मात्र शिक्षण खाते यंदा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे जाणवत आहे. शिवसेना युवा संघटनेचे अध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी ‘शिवसेनेच्या विद्यार्थी विभागातर्फे विद्यापीठावर मोर्चा काढला जाईल’ अशा इशारा दिला आहे. याप्रसंगी शिवसेना युवा संघटनेच्या सचिव मंथन रंकाळे, नेहारिका कामत, संकेत कुडतरकर व आश्विनी शेट्ये उपस्थित होते.

Updated : 25 Aug 2018 2:52 PM IST
Next Story
Share it
Top