Home > मॅक्स एज्युकेशन > जगातील तज्ञ वैज्ञानिकांसमोर देशातील वैज्ञानिकांना मान खाली घालण्याची वेळ

जगातील तज्ञ वैज्ञानिकांसमोर देशातील वैज्ञानिकांना मान खाली घालण्याची वेळ

जगातील तज्ञ वैज्ञानिकांसमोर देशातील वैज्ञानिकांना मान खाली घालण्याची वेळ
X

पंजाबमधील फगवाडा येथे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘१०६व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचा समारंभ पाहता देशातील वैज्ञानिक वातावरण फार काही चांगल नाही असंच सध्याचे वातावरण असल्याचं दिसून आलं. त्यामुळं आता विज्ञानाच्या नावानं काही अवैज्ञानिक बाबींचा प्रचार होत असल्याचं काही वैज्ञानिकांच्या लक्षात आल्यानं या वैज्ञानिकांनी आता या पुरानातील छद्मविज्ञान सांगणाऱ्या वैज्ञानिकांविरोधात विडा उचलला आहे. एरवी प्रमाणे यावेळी देखील पुरानातील दाखले देऊन आपण कसं प्रगत होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेला वैज्ञानिक फार पुढे निघून गेले. त्यांनी रामायण, महाभारतातील काव्यात्म तपशील विज्ञान म्हणून मांडताना विज्ञानाचा पाया रचणारे आणि कळस ठरलेले सर आयझॅक न्यूटन आणि आल्बर्ट आईन्स्टाईन यांचे सिद्धांत चुकीच ठरवण्यापर्यंत आपले ज्ञान पाजळले. त्यामुळे जगातील तज्ञ वैज्ञानिकांसमोर देशातील वैज्ञानिकांना आपली मान खाली घालण्याची वेळी आली. त्यामुळे देशातील ३७ शास्त्रज्ञांनी इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या समारंभात अवैज्ञानिक बाबी मांडणाऱ्या या शास्त्रज्ञाविरोधात देशात वैज्ञानिकक्षेत्रात भरीव कामकरणाऱ्या वैज्ञानिकांनी पत्र लिहिलं आहे.

या पत्रामध्ये आम्हाला या चुकीच्या दाव्यांमुळे मोठा धक्का बसला असल्याचं या वैज्ञानिकांनी म्हटल आहे. हे इंडियन सायन्स कॉंग्रेसचं १०६ वं वर्ष असून इंडियन सायन्स कॉंग्रेसला मोठी परंपरा राहिली आहे. त्यामध्ये आचार्य प्रफुल चंद्र राय, सर रामानंद चोप्रा, प्राण कृष्ण पारिजा या सारख्या जागतिक शास्त्रज्ञांनाचा वारसा लाभला आहे. "आपल्या धार्मिक पुस्तकातील प्रसंग हे काव्यात्मक, प्रेरणादायी, काल्पनिक पण सदाचाराचे धडे देणारी आहेत. मात्र ते वैज्ञानिक नाही किंवा विज्ञानाच्या कसोटीवर तपासलेले नाहीत". असे यापत्रात म्हटले आहे .

कोणी केल्या पत्रावर सह्या…

खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, बेंगलोर येथील आण्विक जीवशास्त्रज्ञ दीपंकर चटर्जी, होमी भाभा सेंटर फॉर सायंटिफिक एज्युकेशनचे शास्त्रज्ञ अनिकेत सुळे, एम. सी. अरुणान आणि जी नागार्जुन, मुंबई आयआयटीचे सदस्य

असलेले अभिजीत मुजूमदार, वैज्ञानिक अध्यापक अरविंद गुप्ता, जवाहरलाल नेहरू ध्रुव रैना विद्यापीठाचे सदस्य आणि एस जी दाणी सेन्टरचे Excellence in Basic Sciencesच्या सदस्यांचा समावेश आहे.

काय म्हटलंय भारतीय ‘त्या' शास्त्रज्ञांनी

गांधारीच्या शंभर पुत्रांचा जन्म टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाने झाला, रावणाकडे पुष्पक हे एकच नव्हे तर एकंदर चोवीस विमाने होती, श्रीलंकेत तेव्हा अनेक विमानतळ होते, सुदर्शन चक्र हे 'गायडेड मिझाईल' होते, विष्णूचे दहा अवतार म्हणजे चार्ल्स डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत असे दावे यावेळी या शास्त्रज्ञांनी मांडले.

विशेष म्हणजे हे बोलणारे देखील दुसरे तिसरे कोणी नाही तर हे आंध्र प्रदेशातील विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसा कौरवांच्या जन्मामागचे आधुनिक तंत्रज्ञान तीन हजार वर्षांपूर्वी होते, तसंच रावणाकडे चोवीस विमाने होती हे देखील त्यांनी या वेळी सांगितलं.

तामिळनाडूचे एक वरिष्ठ विज्ञान संशोधक कानन कृष्णन यांनी तर हद्दच केली. न्युटन, आईन्स्टाईन यांचे सिद्धांत चुकीचे ठरवत त्यांनी दावा केला की त्यांचा सिद्धांत सिद्ध झाल्यास भौतिकशास्त्राबद्दल आता असलेली समज बदलून जाईल. सर आयझॅक न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या प्रतिकूल बलाची कोणतीही समज नव्हती, त्यामुळे त्यांना गुरुत्वाकर्षणाबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत, असं म्हणत आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपला सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडून जगाची दिशाभूल केली, असाही दावा देखील या महोदयांनी आपल्या भाषणात केला. तसंच त्यांचा सिद्धांत स्वीकारला गेला तर गुरुत्व लहरींना 'मोदी लहरी' म्हणून ओळखल्या जाईल आणि गुरुत्व भिंग परिणाम 'हर्षवर्धन परिणाम' म्हणून नावाजेल. असा दावा या महोदयांनी आपल्या भाषणात केल्यानं खऱ्या विज्ञानवादी संशोधकांचा राग अनावर होणं देखील साहजिकच आहे.

Updated : 11 Jan 2019 8:43 AM GMT
Next Story
Share it
Top