Home > मॅक्स एज्युकेशन > विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करु - विनोद तावडे

विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करु - विनोद तावडे

विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करु - विनोद तावडे
X

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राबवली गेली आहे. व्यावसायिक आभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची ५० टक्के रक्कम राज्य शासन महाविद्यालयांना देते. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज जे महाविद्यालय या शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क घेतात,अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे सांगितले आहे.

गेल्या वर्षांत विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली नाही. ज्यांना हि शिष्यवृत्ती मिळाली ती अपेक्षेपेक्षा कमी आढळून आली. तसेच काही महाविद्यालयांत या योजनेतील विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क उकळत असल्याबद्दल विधानसभेत काही सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर आता विनोद तावडे यांनी जे महाविद्यालय या शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क घेतात, अशा महाविद्यालयांवर कारवाई करु असा इशारा दिला आहे.

Updated : 27 Nov 2018 11:54 AM GMT
Next Story
Share it
Top