Home > मॅक्स एज्युकेशन > कुणी शिक्षण देत का शिक्षण? गावात 5 वीचा वर्ग सुरु व्हावा यासाठी गावाचे उपोषण

कुणी शिक्षण देत का शिक्षण? गावात 5 वीचा वर्ग सुरु व्हावा यासाठी गावाचे उपोषण

कुणी शिक्षण देत का शिक्षण? गावात 5 वीचा वर्ग सुरु व्हावा यासाठी गावाचे उपोषण

कुणी शिक्षण देत का शिक्षण? गावात 5 वीचा वर्ग सुरु व्हावा यासाठी गावाचे उपोषण
X

सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत आता देशातील सर्व गावात शिक्षणाची सोय झाली असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र, खरंच सर्व गावात शिक्षणाची गंगा पोहोचली आहे का? अजुनही काही गावात फक्त इयत्ता चौथीपर्यंतच शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी मुलांना काही किलोमीटर पायी जावं लागतं. ग्रामीण भागात आजही हिच परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मौजे सिरसदेवी या गावातील लोक सध्या शिक्षणासाठी उपोषण करत आहेत.

मौजे सिरसदेवी गावात इयत्ता चौथी पर्यंतच शाळा आहे. शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करण्यात यावा. या मागणीसाठी पालकांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. इयत्ता पाचवीसाठी या विद्यार्थ्यांना नॅशनल हायवे ओलांडून जावं लागतं. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून पालकांना आपल्या मुलांना हातातील काम सोडून आणायला आणि सोडायला जावं लागतं.

त्यामुळं लोकांनी पोटापाण्याच्या प्रश्नावर काम करायचं की घरातील एका व्यक्तीला मुलांना आणून नेऊन सोडण्यासाठी घरी ठेवायचं. असा प्रश्न निर्माण झाला आहे.


गेवराई तालुक्यातील मौजे सिरसदेवी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक केंद्रीय शाळा आहे. ही शाळा इयत्ता चौथ्या वर्गापर्यंतच आहे. पाचव्या वर्गाला मान्यता मिळावी यासाठी ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, तसेच पालकांनी मागील काही दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे.

मात्र, या पाठपुराव्याला कोठेही यश आलेले नाही. याच शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पायपीट करत नॅशनल हायवे ओलांडून दुसऱ्या शाळेत जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे गावातील याच शाळेमध्ये पाचवीचा वर्ग चालू करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून प्रशासनाकडे वारंवार करण्यात येत आहे.

परंतु प्रशासनाने या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने शेवटी आपल्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व लवकर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचव्या वर्गाला मान्यता मिळावी. या मागणीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

जिल्हा परिषद शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी उपोषण करावे लागते, ही एक लाजीरवाणी गोष्ट असुन आम्ही वारंवार मागणी करून देखील आमच्या मागणीला प्रशासन दाद देत नाही. मग सदरील प्रशासन कुणाचे दबलेले आहे की काय, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.



गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर नसल्याने आमच्या मागण्या पूर्ण होतं नाही. तोपर्यंत उपोषण चालू राहणार असल्याचे ग्रामस्थांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने गटशिक्षणाधिकारी मिलिंद तुरुकमारे यांच्याशी बातचित केली. ते म्हणाले...

शिरस देवीचे नागरिक उपोषणाला बसले होते. त्यांचा 5 वीच्या वर्गा च्या मान्यतेबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव होता. सदर प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. जिल्हा स्तरावरील पथकाने त्याची तपासणी केली होती. त्या अहवालावर शिक्षण मंत्र्यांचं पत्र देखील आलं आहे. 2009 च्या RT अटी आणि शर्ती ची पूर्तता करत नाही. त्यामुळे या वर्षी इयता 5 वीच्या वर्गास मान्यता देण्यात येणार नाही. असं शिक्षण अधिकाऱ्यांकडून कळवण्यात आलं आहे.

मला काही कामानिमित्त पुण्याला जायचं आहे. मी उपस्थित नव्हतो. उपोषणाला बसलेले सरपंच आणि विधिव्यवस्थापन समितीचे अध्यक्षांसोबत माझं फोन द्वारे बोलणं झालं आहे. त्यांनी मला उपोषण सोडणार नाही ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. असं मला सांगितले आहे. असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गावकऱ्यांनी सदर अधिकारी खाजगी शाळेचं नुकसान होऊ नये म्हणून गावातील प्राथमिक शाळेच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप स्थानक आमदार लक्ष्मण पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


व्ही.एन. राठोड गट शिक्षण आधिकरी प.स गेवराई संस्था चालकांना पाठीशी घालून जि. प. शाळांच्या उन्नती कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मौजे सिरसदेवी येथील जि. प. कें. प्रा. शाळेमध्ये इयता 5 वीच्या वर्गाच्या मान्यतेस स्वतः लक्ष घालून मान्यता मिळून देण्याऐवजी संस्थेच्या शाळेच्या इयता 5वीचा वर्ग वाचवण्यासाठी गटशिक्षण अधिकारी कर्यालयाकडून शिक्षण आधिकरी (प्राथमिक) जि.प.बीड यांना चुकीचा अहवाल सादर केला. यावरून असे निदर्शनास येते की, गट शिक्षण आधिकरी जि. प. शाळेच्या उन्नतीसाठी काम न करता संस्था चालकांना पाठीशी घालून संस्थेचे वर्ग वाचवण्यासाठी लक्ष देत आहेत.

तरी मौजे सिरसदेवी येथील चुकीचा अहवाल सादर केल्या प्रकरणाची चौकशी करून व्ही.एन. राठोड गट शिक्षण आधिकारी प.स गेवराई यांची तात्काळ इतर बदली करण्यात यावी.

अशा मागण्य़ाचं पत्र अधिकाऱ्यांना पाठवलं होतं

दरम्यान या सर्व प्रकरणावर आम्ही आम्ही गावच्या सरपंचांशी बातचित केली...

इयत्ता पाचवीचे वर्ग सुरू करण्यात यावे यासाठी बीड जिल्ह्यातील शिरसदेवी गावचे सरपंच तसेच गावचे विद्यार्थी उपोषणाला बसलेले असून पाचवीची वर्ग सुरू करण्यात यावे कारण केंद्रीय प्राथमिक शाळा असतांना देखील चौथीच्या पुढे येथे वर्ग नाही. लहान मुलांना नॅशनल हायवे दोन किलोमीटर चालून दुसऱ्या शाळेत लहान मुलांना जावे लागते. पाचवीचा वर्ग सुरू करण्याबाबत गावकऱ्यांना एवढी खटाटोप करावी लागत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असं त्या गावच्या सरपंचांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


दरम्यान मौजे सिरसदेवी येथील ग्रामस्थांनी ५ वीचा वर्ग सुरु व्हावा. यासाठी बीड जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तरीही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचं गावकऱ्याचं म्हणणं आहे. गावकऱ्यांनी सदर उपोषण करण्यापुर्वी ग्रामस्थांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करुन उपोषणाची कल्पना दिली होती. मात्र, गावकऱ्यांनी उपोषण करु नये. या संदर्भात जिल्हा परिषदेकडून कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही.

गावकऱ्यांचं जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र...

मौजे सिरसदेवी येथील जि. प. क. प्रा. शाळा इयत्ता चौथी पर्यंत पाचवीच्या वर्गात मान्यतेसाठी ग्रामपंचायत, शाळाव्यवस्थापन, समिती तथा ग्रामस्थ आपल्याकडे मागील वर्षापासून पुरवठा करीत आहेत, आपल्या आदेशानुसार शेवटचा अहवाल आपणाकडे दि.27/11/2020 रोजी गट आधिकरी यांच्या मार्फत सादर करण्यात आला आहे. तरी आज रोजी 5वीच्या शाळा उघडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन नंतर मंजुरी दिली आहे.



परंतू जि. प. क. प्रा. शाळा येथे 5 वीच्या वर्गास नाकारल्याने विद्यार्थ्यांमध्ये तसेच त्यांच्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच आज रोजी शाळेच्या पटावर असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक इतर शाळेत टाकण्यास तयार नाही. कारणास्तव संबंधित विद्यार्थ्यांचे वार्षिक वर्ष वाया जाईल.

तरी मा.साहेबांनी सदरील विषयाचा गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घेऊन या शाळेतील इयत्ता 5 वीच्या वर्गास मान्यता देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती.

असं पत्र गावकऱ्यांना दिलं आहे. तरी या पत्राची कुठलीही दखल सरकारच्या वतीनं घेण्यात आलेली नाही.

त्यामुळे गावच्या ग्रामस्थांना आपल्या मुलांसाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे. मुलांना नॅशनल हायवे पार करुन शाळेत जावं लागतं. त्यामुळं गावाता 5 वीपर्यंत शाळा सुरु व्हावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Updated : 12 Feb 2021 8:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top