Home > मॅक्स एज्युकेशन > रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाचा विचार : डॉ बोऱ्हाडे

रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाचा विचार : डॉ बोऱ्हाडे

रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाचा विचार : डॉ बोऱ्हाडे
X

महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचा विचार म्हणजे रयत शिक्षण संस्था होय. असे मत प्रा. डॉ. शंकर बोर्हाडे यांनी व्यक्त केले. ते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे रयत शिक्षण संस्थेच्या शताद्वी महोत्सवानिमित्त सप्ताहातंर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते त्यांनी कर्मवीर आण्णा आणि आपण या विषयावरील रयत शताद्वी महोत्सव व्याख्यानमालेतील पहिले विचार पुष्प गुंफले.

डॉ. बोर्हाडे यांनी आपल्या व्याख्यानातून काही महत्त्वाची विधाने मांडली त्यामध्ये 1907 साली भरलेल्या मराठा शिक्षण परिषदेतून कर्मवीरांना शिक्षण संस्थेच्या स्थापनेची बीजे मिळाली असल्याचे मत त्यांनी नोंदविले. आरंभी महाराष्ट्रात वसतिगृहाच्या रूपाने ज्या शिक्षण संस्था सुरू झाल्या त्याच आज महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था ठरल्या आहेत. रयत हे अशीच एक शिक्षण संस्था आहे. आज ही संस्था शंभरीकडे वाटचाल करते. त्यामागे कर्मवीरांचे विचार आणि त्यागामुळेच आजवरची वाटचाल झाली आहे. महाराष्ट्रातील ही शिक्षण संस्था केवळ विद्यार्थी उत्पन्न करणारी संस्था नसून विचार देणारी संस्था ठरली आहे. कर्मवीरांनी आयुष्यात अनेक बंडे केली पण ती कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हती. मग त्यांच्या आयुष्यातील डांबर प्रकरण असो अथवा कूपर शेठ प्रकरण. असेही मत त्यांनी नोंदविले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. जे. जी. जाधव होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना कर्मवीरांचे चरित्र अभ्यासण्याचे आवाहन केले. भलेही चरित्रातील सनावळ्या लक्षात राहिल्या नाहीत तरी चालतील पण त्यांच्या चरित्रातील विचार घ्या. या कार्यक्रमांची संयोजक व सूत्रसंचालक म्हणून प्रा. डॉ. मगदूम बी. एम. काम पाहिले तर आभार प्रा. व्ही. व्ही. गाढवे यांनी मानले.

Updated : 7 Oct 2018 12:24 PM GMT
Next Story
Share it
Top