Home > मॅक्स एज्युकेशन > Online Education: गहू तांदूळ नाही मोबाईल द्या...

Online Education: गहू तांदूळ नाही मोबाईल द्या...

Online Education: गहू तांदूळ नाही मोबाईल द्या...
X

पालकांसाठी ऑनलाईन शिक्षण (online Education) मोठं आर्थिक आणि मानसिक संकटा सारखं झालं आहे. अगोदरच कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हातातून गेले आहेत. हाताला काम नाही पैसे नाही. त्यात मुलांच्या मोबाईलवर शिक्षणामूळं पालक मोठया चिंतेत पडलाय. महागडा मोबाईल ( mobile) कुठून आणणार? तसंच त्यासाठी इंटरनेट (internet) हवं. त्या इंटरनेटसाठी रिचार्जला लागणारे दरमहा पैसे कुठून आणणार? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.

सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन क्लास सुरू झाले. विद्यार्थी पालकांकडे मोबाईलची मागणी करत आहेत. आपल्या मुलाचे नुकसान होऊ नये. हे पालकांनाही कळतंय. मात्र, परिस्थिती बिकट असल्याने पालक तरी काय करणार?

आता पालकच म्हणताहेत की, आम्हाला खाण्यासाठी तांदूळ गहू नको. तर मुलांच्या शिक्षणासाठी सरकारनं मोबाईल घेऊन द्यावा. तसंच त्याची रिचार्जची व्यवस्थाही करून द्यावी.

आता ही परिस्थिती एका गावाची शहराची नसून सगळीकडे आहे. घरात दोन तीन मुलं असली की, आणखीनच अडचण होते. 50 ते 60 टक्के पालक अशिक्षित आहे. ऑनलाईन क्लास काय आहे? मुलांना माहितच नाही. मुलं काय शिकताहेत. हे मोबाईलवर कळत नाही. म्हणून शाळाच सुरू करा. असा आग्रह पालक करताहेत.

सध्या लॉकडाऊन असल्याने सर्व बंद आहे. शाळांना कुलूप आहे. मात्र, शासनाने ऑनलाईन शाळा चालू करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने आदेश देतांना ऑनलाईन साठी विद्यार्थ्यांकडे सुविधा आहे का? याची माहिती न घेताच शाळांना ऑनलाईन क्लास सुरू करण्याचे फर्मान सोडले आहे.

ग्रामीण भागातील 50 ते 60 टक्के पालकांकडे ऑनलाइन साठी आवश्यक असलेला मोबाईलच नाहीत. मग ऑनलाईन क्लासेस चा अट्टहास का? असा सवाल उपस्थित होतो. ज्या पालकांकडे मोबाईल आहेत. त्याच मुलांचे क्लास सुरू आहेत. मात्र, इतर मुलांचे नुकसान होत असल्याने जळगाव जिल्ह्यातील असोदा येथील शाळेच्या शिक्षकांनी मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळावे. म्हणून समाज भावनेने ज्यांच्याकडे मोबाईल आहे. 'शिक्षक मित्र' बनवून गरीब वस्तीत जाऊन दोन तास मोबाईलची सुविधा देण्याची संकल्पना चालू केली. त्यामुळं इतर काही गरीब मुलांचं एकत्र येऊन ऑनलाइन शिक्षण मिळत असलं तरी त्याला मर्यादा आहेत.

Updated : 15 Aug 2020 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top