Home > मॅक्स एज्युकेशन > 'एकलव्य' घडवणार एक हजार जागतिक संशोधक

'एकलव्य' घडवणार एक हजार जागतिक संशोधक

भारतातील वंचित घटकातून येत असलेल्या पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. वंचित घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी एकलव्य संस्थेच्या माध्यमातून आता मिळणार आहे.

एकलव्य घडवणार एक हजार जागतिक संशोधक
X

भारतातील वंचित घटकातून येत असलेल्या पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. वंचित घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी एकलव्य संस्थेच्या माध्यमातून आता मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व मार्गदर्शन मोफत असून, अशाच वंचित घटकातून उच्च शिक्षण पूर्ण केलेले मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. देशभरातील, वंचित समूहातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना एकलव्य ही संस्था मार्गदर्शन करत असते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी संस्थेतर्फे, एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स हा प्रोग्रॅम राबवला जातो. या संस्थेचे संस्थापक राजू केंद्रे जे स्वतः पहिल्या पिढीतील शिक्षण आहेत, त्यांना मागील वर्षी प्रतिष्ठित अशी, चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली होती. यामुळे त्यांना लंडन येथे जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. आपल्याला मिळालेल्या परदेशी शिक्षणासारखीच संधी अनेकांना मिळावी म्हणून 'ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम' एकलव्यने सुरु केला आहे.





डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 'एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम'ची सुरुवात

अशा कार्यक्रमातून येत्या दहा वर्षात हजार विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्याचा एकलव्यचा मानस आहे. यंदाच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकलव्यने 'एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम'ची सुरुवात केली. हा प्रोग्रॅम तळागाळातील उपेक्षित समूहाच्या, पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, यु.के. आणि युरोपात, मानविकी आणि सामाजिक विज्ञान , माध्यम (मीडिया) आणि कायदा अशा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि पीएचडी मार्गदर्शनासाठी सुरु केला गेला. पुढील काही वर्षांमध्ये अमेरिका आणि इतर देशांमधल्या अर्जांच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा एकलव्य विस्तार करणार आहे. एकलव्य ग्लोबल स्कॉलर्सचे पहिले निवासी शिबीर जुलै २०२२मध्ये वर्धा येथे आयोजित केले गेले. बूटकॅम्प, ऑनलाईन कार्यशाळा आणि अनेक चर्चासत्रे याद्वारे परदेशातील विद्यापीठे आणि स्कॉलरशिपसाठी लागणाऱ्या अर्जाचे मार्गदर्शन, आयईएलटीएस (IELTS) प्रशिक्षण, स्टेटमेंट ऑफ पर्पजचे लेखन, लेटर्स ऑफ रिकमेंडेशन, व्हिजा सुविधा या सगळ्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले गेले.





एक विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक

एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅमच्या दुसऱ्या निवासी शिबिराचे आयोजन ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत, नागपूर येथील अशोकवन या ठिकाणी केले आहे. एका विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक, अशा पद्धतीने एकलव्य १८ राज्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांबरोबर काम करत आहे. जिथे ९० मार्गदर्शक, मार्गदर्शन करत आहेत. जे भविष्यातील स्कॉलर्सला मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे मार्गदर्शक वन टू वन मेंटरिंग करण्यास एकलव्यला मदत करत आहेत. चेवेनिंग शिष्यवृत्ती अर्जांसाठीसुद्धा त्यांची खूप मदत झाली आहे. यंदा जीएसपी (GSP) कोहर्टच्या पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी चेवेनिंग शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. एकलव्यला आशा आहे की, यंदा एकलव्य मधील चेवेनिंग स्कॉलर्सची संख्या दुहेरी अंकात असेल.

साठहून अधिक विद्यार्थी तर आठ मार्गदर्शक सहभागी होणार

निवासी शिबिरात साठहून अधिक विद्यार्थी आणि आठ मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. दुसऱ्या शिबिरात चेवेनिंग स्कॉलरशिप नंतरच्या ज्या जागतिक पातळीवरील संधी आहेत जसे की, कॉमनवेल्थ , इरासमस तसेच इतर संधींबाबत मार्गदर्शन केले जाईल. या दुसऱ्या शिबिरात अदिती प्रेमकुमार (ऑक्सफर्ड विद्यापीठ), अनिश गवांडे (कोलंबिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ), आशीर्वाद वाकडे (शिकागो विद्यापीठ), भीमाशंकर शेतकर (जर्मन चान्सलर फेलो), पवन कुमार श्रीराम (इरॅसमस मुंडस स्कॉलर), सौरभ वैती (कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलर), सुमित सामोस (ऑक्सफर्ड विद्यापीठ) हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.

Updated : 11 Nov 2022 4:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top