Home > मॅक्स एज्युकेशन > वाझे प्रकरणापासून कॉंग्रेस अलिप्त...

वाझे प्रकरणापासून कॉंग्रेस अलिप्त...

वाझे प्रकरणापासून कॉंग्रेस अलिप्त...
X

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या एका स्कॉर्पिओत स्फोटक आढळली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली...

'वाझे चौकशीमध्ये काय उत्तर देतात. हा भाग नाही. कॉंग्रेसचा कोणालाही पाठीशी घालण्याचा भाग नाही. जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी. असं मत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.' असं म्हणत कॉंग्रेसने सचिन वाझे प्रकरणात आता हात झटकले आहेत. हा अगोदर नाना पटोले यांनी सचिन वाझेला विरोधक खलनायक बनवत असल्याचा आरोप केला होता. मात्र, यावेळी दोषींवर कारवाई करा असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.

काय म्हटलं होतं नाना पटोले यांनी?

विरोधक खोटे आरोप करून महाराष्ट्रला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सचिन वाझे प्रकरणी खलनायक करण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. डबल ढोलकी वाजवण्याची भाजपाचा सुरू आहे. देशात महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. सचिन वाझेंना खलनायक बनविण्याचे काम विरोधक करत आहेत, असं सांगतानाच तपास यंत्रणानी नार्को टेस्ट करायची असेल तर करू द्यावी. असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं होतं. मात्र, आज पटोले यांनी कॉंग्रेसचा कोणालाही पाठीशी घालण्याचा भाग नाही. असं म्हणत या प्रकरणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय..

NIA केंद्राचा पोपट...

केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या इशाऱ्याने काम करतंय. सचिन वाझेला ATS ने अटक केलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केलेली आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा कोणाची आहे. कोणाच्या इशाऱ्यावर काम करते? हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला नार्को टेस्ट करायची तर करा. तुम्ही विधानसभेत मागणी करत होते. सचिन वाझेची नार्को टेस्ट करा. तो तुमचाच आहे. तो पोपट केव्हा आणायचं? केव्हा वापरायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. मागणी कशाला करता? म्हणजे तुम्ही मागणी कशाला करता?

यावर आमचा आक्षेप आहे. आमच्या महाराष्ट्राला बदनाम करायचं. ज्या पद्धतीने भाजपने सत्र सुरु केलं आहे. सुशांत सिंह राजपुतची घटना महत्त्वाची आहे. त्यामाध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करुन बिहारची निवडणूक जिंकण्याचं भाजपने केलं आहे.

1 किलोमीटर अंतरावर गाडी... जे काही सांगण्यात येतं की अंबानीच्या घराजवळ जिलेटीनची आणि स्फोट न होणारी गाडी ठेवली गेली होती. हे चुकीचं वारंवार सांगण्यात येतं. ही गाडी अंबानीच्या घरापासून 1 किमी अंतरावर होती. त्यामुळं अंबानीच्या विटेला देखील धक्का लागला नसता. मात्र, अंबानीसारख्या व्यक्तीचं नाव घेऊन देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा वळवला जात आहे.

मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न...

भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही. सचिन वाझे प्रकरणाच्या आडून मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करत आहे, हे काँग्रेस कधीच सहन करणार नाही.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. या गोंधळामुळे काल 9 मार्च विधानसभेचे कामकाज नऊ वेळा तहकूब झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर एनआयए ने चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली. त्यानंतर वाझे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने वाझे यांना 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Updated : 16 March 2021 12:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top