Home > मॅक्स एज्युकेशन > बारावीच्या निकालाच्या कामासाठी मुदत वाढ द्या; शिक्षक संघटनांची मागणी

बारावीच्या निकालाच्या कामासाठी मुदत वाढ द्या; शिक्षक संघटनांची मागणी

बारावीच्या निकालाच्या कामासाठी मुदत वाढ द्या; शिक्षक संघटनांची मागणी
X

मुंबई // 16 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर लगेच अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परिक्षेची तारीख देखील जाहीर करण्यात आली. मात्र, दहावी - अकरावीनंतर सर्वांचेच लक्ष लागलेल्या बारावीच्या निकालाच्या कामासाठी मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी राज्यातील शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

महाराष्ट्र शासनाने बारावीच्या शिक्षकांना 21 जुलैपर्यंत गुण भरण्याची मुदत दिली आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेला हा कालावधी पुरेसा नसल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा कालवधी चार दिवसांनी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शिक्षणमंत्री गायकवाड शिक्षक संघटनांच्या या मागणीवर नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

असा आहे बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला !

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, परिक्षा रद्द करण्यात आल्याने सर्वांनाच प्रश्न पडला होता तो निकालाबाबत. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून निकालाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. ज्यानुसार बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. शासनाने दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी केली आहे.

असा लावणार निकाल!

इयत्ता दहावीसाठी निकष

महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या निकालाच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्याला सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

इयत्ता अकरावीसाठी निकष

इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुणांचा निकष यंदाच्या निकालात ग्राह्य धरण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीसाठी निकष

इयत्ता बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश असणार आहे. ज्यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि इतर मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिला जाणार आहे.

Updated : 21 July 2021 6:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top