Home > मॅक्स एज्युकेशन > वाढत्या तापमानाला लक्षात घेता ; राज्यातील शाळांना आज पासून सुट्टी

वाढत्या तापमानाला लक्षात घेता ; राज्यातील शाळांना आज पासून सुट्टी

मराठी विषयाकडे दुर्लक्ष केले गेले नाही पाहिजे : दीपक केसरकर

वाढत्या तापमानाला लक्षात घेता ; राज्यातील शाळांना आज पासून सुट्टी
X

मे महिना येताचं लहान मुलांपासून सगळ्यांनाचं सुट्टी ची आतुरता लागली असते. परंतु अनेक शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या नाहीत किंवा पुढील वर्षाच्या अभ्यासक्रम या मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये एक्सट्रा लेक्चर म्हणून सुरु करण्यात आला. मात्र उन्हाचा तडाका इतका वाढला आहे कि खारघरमध्ये उष्माघाताने १४ जणांचा बळी घेतला.

वाढत्या उन्हामुळे पालकही चिंतेत होते. त्यादृष्टीने पालकांनी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा आग्रह धरला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार, आजपासून (२१ एप्रिल) पूर्ण अभ्यासक्रम असलेल्या सर्व शाळा बंद राहतील.

याबाबत "शुक्रवारपासून (21 एप्रिल) मुलांना सुट्टी जाहीर केली जात आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम अद्याप सुरू आहे, त्या शाळा वगळता इतर सर्व मंडळाच्या शाळा बंद राहतील. उर्वरित महाराष्ट्राचे शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू होईल; त्यानंतर विदर्भात ३० जूनला सुरुवात होईल.

"शाळांमध्ये उन्हाळ्यात अतिरिक्त वर्ग किंवा अतिरिक्त अभ्यासक्रम आयोजित केले जातात. ते सकाळी किंवा संध्याकाळी आयोजित केले जावे. दुपारच्या सत्रात ते घेतले जाऊ शकत नाही. इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी वगळता, इतर कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये. कारण उष्णतेच्या लाटेचा परिणाम होऊ शकतो. शिवाय, दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार, तरुणांना विश्रांतीच्या वेळी अभ्यास करण्याची गरज नाही.

"सर्व राज्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा आवश्यक विषय प्रस्थापित करण्यात आला आहे. दीपक केसरकर यांच्या मते मराठी विषयाकडे दुर्लक्ष केले गेले नाही पाहिजे.

Updated : 21 April 2023 3:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top